Anger Over Sale Moves of Hanuman Temple in Malegaon
नाशिक – पेशव्यांचे सरदार नारोशंकर(Malegaon Hanuman Temple) राजेबहाद्दर यांनी मालेगावत बांधलेल्या भुईकोट किल्ल्यालगत असलेले जवळपास ३०० वर्षे जुने (Malegaon Temple Controversy)किल्ला हनुमान मंदिर विक्री करण्याच्या घाट घातला आहे. यामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.(Religious Places in Malegaon)
१७४० मध्ये सरदार नारोशंकर यांनी मोसम नदीच्या काठावर भुईकोट किल्ला उभारला. त्याच सुमारास उत्तरेकडील बाजूस हनुमान मंदिराची स्थापना केली. मंदिराच्या शेजारी १९२८ मध्ये भगवंत व्यायाम शाळा सुरू करण्यात आली. १९५२ मध्ये धर्मदाय आयुक्तांकडे व्यायाम शाळेची संस्था म्हणून नोंदणी झाली. दिवंगत भगवंतराव राजेबहाद्दर हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. समाजाभिमुख कार्य करण्याबद्दल राजेबहाद्दर घराण्याची विशेष परंपरा राहिली.
पण एप्रिल महिन्यात राजेबहाद्दर घराण्याच्या दोन महिला वारसदारांनी ही जागा विक्री करण्याच्या हेतूने मालेगावातील कमर खान नसीम खान यांच्या नावाने अधिकार पत्र दिले. त्यानुसार खान यांना या जागेचे खरेदीखत नोंदविण्याचे अधिकार मिळाले. ही बाब उघड झाल्यानंतर मंदिर व्यवस्थापन व स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या विक्रीच्या प्रयत्नांना बेकायदेशीर ठरवत मंदिर व्यवस्थापनाकडून वकिलामार्फत संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे.
मंदिर व्यवस्थापनाचे वकील शिशिर हिरे म्हणाले की,कायद्यानुसार या जागेवर मारुतीरायांचे अढळ स्थान आहे. मंदिरासह किल्ल्याची जागा शासनजमा व्हायला हवी होती. तांत्रिक चुकांमुळे तसे झाले नाही. वारसांनी त्याचा गैरफायदा घेतला असून शासनाची फसवणूक केली जात आहे.