Jio prepaid plan price hike: टेलिकॉम क्षेत्रात स्पर्धा वाढलेली असतानाच रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या प्रीपेड (Jio prepaid plan price hike) प्लॅनमध्ये मोठा बदल केला आहे. ग्राहकांना मोठा धक्का देत जिओने 84 दिवसांच्या वैधतेचा आणि दररोज 1.5GB डेटा देणारा 799 रुपयांचा प्लॅन बंद केला आहे.
जिओने 799 रुपयांच्या या प्लॅनऐवजी, आता असेच फायदे देणारा प्लॅन 899 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच ग्राहकांना आता यासाठी 100 रुपये अतिरिक्त खर्च करावे लागणार आहे.
या बदलामुळे, जिओच्या ग्राहकांसाठी आता 84 दिवसांसाठी दररोज 1.5GB डेटा हवा असल्यास 899 रुपयांचा प्लॅन हा एकमेव पर्याय उपलब्ध असेल. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल्स, दररोज 100 एसएमएस आणि जिओ ॲप्सचा मोफत वापर यांसारखे फायदे आहेत. विशेष म्हणजे, या नव्या प्लॅनमध्ये JioSaavn Pro चा देखील फायदा मिळेल.
जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन बंद
यापूर्वी जिओने 249 रुपयांचा आपला ‘एंट्री-लेव्हल’ प्रीपेड प्लॅन देखील बंद केला होता. यामध्ये दररोज 1GB डेटा मिळायचा. हा कंपनीचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्सपैकी एक होता. जिओच्या या पावलामुळे इतर टेलिकॉम कंपन्याही दरवाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नुकतेच एअरटेलने आपला 249 रुपयांचा रिचार्ज प्लॅन वाढवून 299 रुपये केला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता मोबाइल रिचार्जसाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार आहेत.
हे देखील वाचा –
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागे ‘मोठे’ कारण? राहुल गांधींच्या विधानामुळे जोरदार चर्चा