मुंबई – उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून कोणताही दगाफटका होणार नाही, यासाठी भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकली आहे. याच अनुषंगाने फडणवीसांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांना फोन करत एनडीए उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे एनडीएचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी. व्ही. राधाकृष्णन (Governor C. V. Radhakrishnan)यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस हे महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांशी संवाद साधणार आहेत. याचाच भाग म्हणून फडणवीसांनी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधत एनडीएला (NDA)पाठिंबा देण्याची विनंती केली. याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी आपल्या महाराष्ट्रातील माणूस उपराष्ट्रपती होतो म्हणून त्यांना मतदान केले पाहिजे. इतर पक्षांनाही माझे हे आवाहन आहे. विशेषतः महाराष्ट्राची अस्मिता सांगणारे पक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस (Sharad Pawar’s NCP) यांनी सी. पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा दिला पाहिजे. महाराष्ट्रातला एक मतदार उपराष्ट्रपती होतो, त्यासाठी त्यांना सर्वांनी मदत करायला हवी.
शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी फडणवीसांनी ठाकरेंना फोन केल्याचे सांगितले. ते म्हणाले, फडणवीसांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात उद्धव ठाकरेंना फोन केला होता. मतांसाठी दोघांनीही विनवणी केली.
याआधी ठाकरेंच्या शिवसेनेने इंडिया आघाडीचे उमेदवार रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे. आज सुदर्शन रेड्डी यांनी आपला अर्ज दाखल केला. यावेळी इंडिया आघाडीतील (INDIA bloc)सर्व प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होती. लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य (Members of both Lok Sabha and Rajya Sabha)उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदार असतात. दोन्ही सभागृहांत सत्ताधारी एनडीएचे बहुमत आहे. एकूण ७८२ खासदार असून निवडणुकीत विजयासाठी ३९२ मतांची गरज आहे. एनडीएकडे जवळपास ४२७ तर (427 MPs) इंडिया आघाडीकडे ३५५ खासदारांचं संख्याबळ आहे. महाराष्ट्रात सध्या एकूण ६८ खासदार आहेत. यामध्ये मविआकडे ३८ तर महायुतीकडे ३० खासदार आहेत.