Centre Proposes GST Exemption on Health Insurance
नवी दिल्ली – आरोग्य विमा आणि जीवन विमा यांसारख्या विमा योजनांना वस्तू आणि सेवा करातून (GST exemption on health insurance) सूट द्यावी,असा प्रस्ताव केंद्र सरकारने जीएसटी परिषदेला दिला आहे,अशी माहिती बिहारचे उप मुख्यमंत्री आणि विमा विषयक मंत्रिगटाचे निमंत्रक सम्राट चौधरी यांनी दिली.(Insurance policy)
सध्या विमा पॉलिसींवर १८ टक्के जीएसटी आकारला जातो. (Life insurance GST removal)तो रद्द करण्याबाबत मंत्रिगटाची नुकतीच बैठक झाली. बैठकीत सर्वपक्षीय खासदारांनी सरकारच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. मात्र जीएसटी माफ केल्याचा लाभ विमाधारकांना मिळावा याची व्यवस्था करावी,अशी मागणी बहुतांश खासदारांनी केली,अशी माहिती तेलंगणाचे उप मुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमरका यांनी दिली.
आम्ही सर्वांनी स्पष्टपणे सांगितले की जीएसटी माफ केल्याचा लाभ विमा कंपन्यांना न होता विमा पॉलिसीधारकांना मिळाला पाहिजे. त्यासाठी स्वतंत्र अशी यंत्रणा निर्माण करावी लागेल,असे आम्ही जीएसटी परिषदेला सांगितले. त्यावर आता जीएसटी परिषद विचार करत आहे,असे विक्रमरका यांनी सांगितले.
