MVA Holds Peace March in Sangamner After Kirtankar Bhandare’s Threat
संगमनेर – संगमनेरमध्ये कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Kirtankar Bhandare threat)यांना दिलेल्या आम्हाला नथुराम गोडसे व्हायला लावू नका या धमकीनंतर राजकीय वातावरण तापले आहे. (Sangram Bhandare controversy)याच पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने(MVA) आज शांती मोर्चा काढला होता. या मोर्चात आमदार सत्यजित तांबे(Satyjit Tambe), जयश्री थोरात (Jayashree Thorat)यांच्यासह मविआतील नेते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, (EVM)ईव्हीएमपासून घोटाळ्यांपर्यंत सर्व बाबतीत आमच्यावर आरोप ठेवून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न चालू आहे. आम्ही नेहमी सर्वधर्म समभाव आणि बंधुभाव जपण्याचा प्रयत्न केला. वारकरी संप्रदाय कोणत्याही पक्षाचा, धर्माचा वा जातीचा नाही. मंचावर गरीब-श्रीमंत एकत्र बसतात हीच खरी परंपरा आहे. ती खंडित होऊ देणार नाही. या तालुक्याची शांतता, सहकार आणि विकास मोडण्याचा कट रचला जातोय. परंतु आम्ही या भूमीचा बंधुभाव तुटू देणार नाही.
कीर्तनकार संग्राम भंडारे आज आपला बचाव करताना म्हणाले की, १६ ऑगस्ट रोजी संगमनेरच्या भुलेवाडी गावात कीर्तनकार संग्राम भंडारे यांचे कीर्तन सुरू असताना काही व्यक्तींनी हेतुपुरस्सर गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. रात्री साडेदहाच्या सुमारास एका व्यक्तीने बडबड सुरू केल्यावर त्याला शांत राहण्यास सांगितले. तेव्हा पाच-सहाजण त्यांच्यावर धावून आले. मात्र उपस्थित ५०-६० भगव्या टोप्या घातलेल्या हिंदुत्ववादी सहकाऱ्यांनी प्रसंग हाताळला अन्यथा अनर्थ झाला असता. मी नथुराम गोडसे यांचा विचार वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर मांडला का? परंतु तो मी मांडू शकतो. कारण संविधानाने मला तो अधिकार दिला आहे. थोरात यांनीच त्यांच्या विरोधात चुकीचा व्हिडिओ पसरवला. हल्ल्याचे गांभीर्य त्यांनी समजून घ्यावे आणि हल्लेखोरांना समर्थन देऊ नये. अन्यथा संगमनेरमध्ये परिस्थिती बिघडेल. ४० वर्षे संगमनेरचे नेतृत्व करणाऱ्या थोरात यांनी एका कीर्तनकारावर अशाप्रकारे तुटून पडण्याऐवजी आत्मपरीक्षण करावे.