Home / महाराष्ट्र / कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे पावसाचा जोर ओसरणार ! हवामान खात्याचा अंदाज

कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे पावसाचा जोर ओसरणार ! हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra Rain Updates

मुंबई– मागील चार दिवसांपासून राज्यभरात कोसळणार्‍या मुसळधार पावसाचा (rainfall)जोर आज काहीसा ओसरला होता.
त्याचप्रमाणे पुढील काही दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

प्रादेशिक हवामान केंद्राच्या (Regional Meteorological Centre,) अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र मराठवाडा(Marathwada)तसेच कोकण भागात कमाल तापमानात पुढील २४ तास कोणताही बदल राहणार नाही. मात्र त्यानंतर दोन ते चार अंशांनी तापमान वाढेल. बंगालच्या उपसागरात असणारा कमी दाबाचा पट्टा आता उत्तरेकडे सरकत आहे. तसेच अरबी समुद्रावर असणारे चक्राकार वारेही (cyclonic circulations)गुजरातच्या दिशेने वाहत असल्याने पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. आजपासून पुढील ३ दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

२३ ऑगस्टपर्यंत मुंबई (Mumbai), कोकण,मध्य महाराष्ट्र भागात वाऱ्याचा वेग ४० ते ५० किलोमीटर प्रति तास राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. २५ ऑगस्टनंतर कोकण आणि मध्य महाराष्ट्र सह गुजरातमध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढू शकतो . पुढील पाच दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कमी होणार आहे. मात्र,
कोकणात पुढील चार दिवस पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, घाटमाथ्यावरही हाय अलर्ट देण्यात आले असून दोन दिवसांनी विदर्भात पावसाचा जोर वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.