Home / Uncategorized / नाशिकमध्ये कंत्राटदारांकडून सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

नाशिकमध्ये कंत्राटदारांकडून सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

Symbolic Funeral Procession of the Government by Contractors in Nashik

Symbolic Funeral Procession of the Government by Contractors in Nashik

नाशिक – शासकीय विभागांकडून कोट्यवधी रुपयांची थकीत बिले न मिळाल्यामुळे हताश झालेल्या कंत्राटदारांनी(Nashik contractors protest) आज नाशिकमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध नोंदवला.(Government criticism protest)

राज्यातील विविध विभागांमध्ये थकीत बिलांचा आकडा तब्बल ९० हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. फक्त नाशिकमध्येच सुमारे ७ हजार कोटींची बिले थकले आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही देयके मिळत नसल्याने कंत्राटदार संतापले आहेत.(Contractor agitation)

संघटनांनी आरोप केला की, शासनाचा कारभार पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, जलजीवन मिशन, ग्रामीण पाणीपुरवठा, जलसंपदा यांसह विविध विभागांच्या विकासकामांसाठी केलेल्या खर्चाची देयके मिळालेली नाहीत. परिणामी हजारो कंत्राटदार, मजूर संस्था, वाहतूकदार, साहित्य पुरवठादार आणि लाखो रोजंदारी कामगार आर्थिक संकटात सापडले आहेत. देयके मिळत नाहीत, कामांच्या मुदतीत विनादंड वाढ दिली जात नाही, अनामत व अतिरिक्त रक्कम परत केली जात नाही आणि निधीअभावी कामे बंद आहेत,. या संकटामुळे आम्हाला आर्थिकच नव्हे तर मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.