Home / महाराष्ट्र / सरकारची कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी खास भेट; 23 ऑगस्टपासून टोल फ्री प्रवास, वाचा वाहतुकीचे नियम

सरकारची कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी खास भेट; 23 ऑगस्टपासून टोल फ्री प्रवास, वाचा वाहतुकीचे नियम

Ganeshotsav 2025 toll Free Travel Pass

Ganeshotsav 2025 toll Free Travel Pass: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 2025 च्या गणेशोत्सवासाठी महाराष्ट्र सरकारनेमहत्त्वाच्या महामार्गांवर 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2025 या कालावधीत टोल माफ (Ganeshotsav 2025 toll Free Travel Pass) करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. या निर्णयाचा लाभ खासगी वाहने आणि एसटी बसला मिळेल. हा लाभ मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) अखत्यारीतील रस्त्यांवर मिळेल.

‘कोकण दर्शन’ पास कसा मिळवायचा? (Ganeshotsav 2025 toll Free Travel Pass)

टोलमाफीचा लाभ घेण्यासाठी भाविकांना “गणेशोत्सव 2025 – कोकण दर्शन” नावाचा विशेष पास घ्यावा लागेल. हा पास संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालये (RTO), पोलीस विभाग आणि वाहतूक प्राधिकरणांकडून उपलब्ध करून दिला जाईल. या पासवर वाहन क्रमांक आणि मालकाचे नाव नोंदवले जाईल. हाच पास कोकणातून परत येतानाही वैध राहील.

जड वाहनांसाठी वाहतुकीचे नवे नियम

गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर 16 टन किंवा त्याहून अधिक वजन असलेल्या अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

प्रवेशबंदीचे वेळापत्रक:

  • 23 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 28 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेपर्यंत: गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीच्या प्रवासासाठी जड वाहनांना वाहतूक बंदी असेल. यामध्ये ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर, लॉरी आदी वाहनांचा समावेश आहे.
  • 31 ऑगस्ट आणि 2 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत: गौरी गणपती विसर्जनासाठी जड वाहतुकीस बंदी असेल.
  • 6 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते 7 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत: अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन आणि परतीच्या प्रवासासाठी जड वाहतुकीस बंदी राहील.

या निर्णयामुळे भाविकांना कोकणातील आपल्या गावी पोहोचणे अधिक सोपे आणि कमी खर्चाचे होणार आहे, तसेच वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होईल.


हे देखील वाचा –

Dream 11 ॲप कायमचे बंद होणार? ऑनलाइन गेमिंग विधेयकामुळे कोट्यावधीचा व्यवसाय धोक्यात, ‘या’ ॲप्सना मोठा फटका

Hero MotoCorp ची नवीन Glamour X 125 बाईक लाँच; किंमत 90 हजार रुपयांपेक्षा कमी

रेल्वे प्रवासासाठी आता ‘एअरपोर्ट’सारखे नियम; सामानाचे वजन तपासले जाणार; जाणून घ्या बदल