Maharashtra Paalna Yojana: केंद्र सरकारच्या मिशन शक्ती अंतर्गत ‘सामर्थ्य’ या उपक्रमातून महाराष्ट्रातील नोकरदारआणि कामगार महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची योजना (Maharashtra Paalna Yojana) सुरू करण्यात आली आहे.
महिलांना कामाच्या वेळी आपल्या मुलांची काळजी घेता यावी, यासाठी अंगणवाडीमध्ये ‘पाळणा’ (Maharashtra Paalna Yojana) ही योजना सुरू करण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेयांनी ही माहिती दिली असून, यामुळे मुलांना सुरक्षित आणि दर्जेदार संगोपनाची सुविधा मिळणार आहे.
या योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे निधी उपलब्ध करून देणार आहेत. पहिल्या टप्प्यात राज्यात 345 ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा व उपक्रमांचा आज मंत्रालय, मुंबई येथे आढावा घेतला.
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) August 21, 2025
महिलांच्या आरोग्याशी निगडित समस्या सोडवण्यासाठी आदिशक्ती अभियानांतर्गत प्रयत्न होत आहेत. कुपोषण,… pic.twitter.com/eSF2Bie1H2
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये (Maharashtra Paalna Yojana)
- वयोगट: 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील मुलांसाठी ही योजना आहे.
- वेळापत्रक: ही पाळणाघरे महिन्यातून 26 दिवस आणि दररोज 7.5 तास सुरू राहतील.
- मुलांची संख्या: प्रत्येक पाळणाघरात जास्तीत जास्त 25 मुलांची व्यवस्था असेल.
- सुविधा: मुलांना डे-केअर सुविधा, पूर्व शालेय शिक्षण, पूरक पोषण आहार, आरोग्य तपासणी आणि लसीकरण यांसारख्या सेवा पुरवल्या जातील.
- आहार: मुलांना दिवसातून तीन वेळा नाश्ता आणि शिजवलेले गरम जेवण दिले जाईल.
- कर्मचारी: प्रत्येक पाळणाघरात एक प्रशिक्षित पाळणा सेविका आणि एक पाळणा मदतनीस नेमण्यात येणार आहे.
कर्मचाऱ्यांचे मानधन आणि इतर योजना
या योजनेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मानधन निश्चित करण्यात आले आहे:
- पाळणा सेविका: 5,500 रुपये प्रतिमाह मानधन.
- पाळणा मदतनीस: 3,000 रुपये प्रतिमाह मानधन.
- अंगणवाडी सेविका: 1,500 रुपये प्रतिमाह भत्ता.
- अंगणवाडी मदतनीस: 750 रुपये प्रतिमाह भत्ता.
हे देखील वाचा –
जीएसटीमध्ये आता 4 नव्हे तर फक्त 2 स्लॅब; मंत्रिगटाची मान्यता; वाचा काय होणार स्वस्त
Hero MotoCorp ची नवीन Glamour X 125 बाईक लाँच; किंमत 90 हजार रुपयांपेक्षा कमी