Home / मनोरंजन / Tamil Superstar Thalapathy Vijay : तमिळ सुपरस्टार थलपती विजय स्वबळावर विधानसभा लढणार

Tamil Superstar Thalapathy Vijay : तमिळ सुपरस्टार थलपती विजय स्वबळावर विधानसभा लढणार

Thalapathy Vijay

चेन्नई – तामिळ सुपरस्टार थलपती विजय (Tamil Superstar Thalapathy Vijay to Contest Assembly Polls Independently) यांनी तामिळनाडूमध्ये होणाऱ्या २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत (Tamil Nadu Assembly elections)कुठल्याही राजकीय पक्षासोबत युती करणार नसल्याचे स्पष्ट केले. मदुराई येथे झालेल्या आपल्या अर्थात तमिलगा वेंट्री कझग (TVK) या पक्षाच्या दुसऱ्या राज्यस्तरीय बैठकीत विजय यांनी भाजपा आणि द्रमुकसोबत युती (alliances)न करण्याचा निर्णय घेतला. आपला पक्ष युतीत गुलामी करणार नाही तर स्वबळावर निवडणूक लढणार असे त्यांनी घोषित केले आहे.

अभिनेता विजय म्हणाले की, माझा पक्ष तामिळनाडूतील सर्व २३४ जागांवर (all 234 seats) निवडणूक लढेल. जंगलात केवळ एकच शेर असतो आणि शेर कायम शेरच राहतो. १९६७ आणि १९७७ च्या निवडणुकीचा (1967 and 1977 elections)उल्लेख करत २०२६ मध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होईल असा विश्वास विजय यांनी व्यक्त यावेळी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, मी राजकारणात स्वत:चा बाजार उघडण्यासाठी आलो नाही तर लोकांची सेवा करायला आलो आहे. भाजपा (BJP)आपला एकमेव वैचारिक शत्रू (ideological enemy)आहे तर द्रमुक राजकीय शत्रू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तामिळनाडूच्या गरजांना कायम वंचित ठेवले आहे. भाजपा अल्पसंख्याक समुदायासोबत भेदभाव करत आहे. एमजीआर यांनी सुरू केलेला पक्षही आता बदलला आहे.जे राज्यात एखादी धाड पडते तेव्हा अण्णा द्रमुकचे नेते दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटतात. त्यानंतर तो मुद्दा अचानक शांत होतो. मुख्यमंत्र्यांनी महिलांसह परुंधूर एअरपोर्टसाठी शेतकरी आणि मच्छिमारांचीही फसवणूक केली आहे