Seeking votes from the parties you split? Raut Slams CM Fadnavis
मुंबई – उप राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून(Vice Presidential election) आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते (UBT)संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर (NDA) निशाणा साधला. तुम्ही जे पक्ष फोडलेत, त्याच पक्षांकडे मदत का मागता,असा बोचरा सवाल राऊत यांनी केला. उप राष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन(C P Radhakrishnan)यांना पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधला ही गोष्ट खरी आहे. आम्ही त्याकडे शिष्टाचाराचा भाग म्हणून पाहतो.पण मला मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis)आणि रालोआच्या नेत्यांना विचारावेसे वाटते जे पक्ष तुम्ही फोडले त्याच पक्षांकडे मदत कशी काय मागता,तुम्हाला आंध्र आणि तेलंगणातील खासदारांची शाश्वती वाटत नाही, की ड्युप्लिकेट शिवसेनेवर तुमचा भरवसा नाही, असे राऊत म्हणाले. यासंदर्भातील आपली भूमिका राऊत यांनी पुढे स्पष्ट केली. उप राष्ट्रपदीपदासाठी इंडिया आघाडीने एकमताने उमेदवार निश्चित केला आहे. बी सुदर्शन रेड्डी हे आमचे उप राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत. त्यांनाच आमचा पाठिंबा असेल. अन्य कोणाला पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. सी पी राधाकृष्णन यांच्याबद्दल तर चर्चाही होऊ शकत नाही.त्यांनी मराठी उमेदवार दिला असता तर किमान चर्चा तरी होऊ शकली असती,असा तिरकस टोला राऊत यांनी लगावला.