Home / देश-विदेश / उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनखड कुठे आहेत? समोर आली माहिती

उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनखड कुठे आहेत? समोर आली माहिती

Jagdeep Dhankhar

Jagdeep Dhankhar: माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी उपराष्ट्रपतीपदाचा अचानक राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. विरोधकांनी त्यांच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र, राजीनामा दिल्यानंतर ते कुठे आहेत, याबाबतची माहिती समोर आली आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, धनखड सध्या दिल्लीतील उपराष्ट्रपती भवनातील निवासस्थानी आहेत. तेथे ते योग आणि टेबल टेनिस खेळण्यात व्यस्त आहेत.

लोकसभा पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनखड यांनी अचानक राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते कुठे आहेत, याबद्दल विरोधक प्रश्न विचारत आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देखील धनखड अचानक गायब होण्यामागे माठे कारण असल्याचा दावा केला होता. मात्र, आता त्यांच्याबाबत माहिती समोर आली आहे.

धनखड हे राजीनामा दिल्यानंतर अद्याप सार्वजनिक मंचावर दिसलेले नाहीत. त्यामुळे ते नक्की कुठे आहेत, असा प्रश्न विचारला जात होता. मात्र, ते दिल्लीत असून, योग आणि टेबल टेनिस खेळण्यात व्यस्त असल्याचे माहिती समोर आली आहे.

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक

दरम्यान, धनखड यांनी राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगानेदिलेल्या माहितीनुसार, 9 सप्टेंबर रोजी मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.

एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनयांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. तर विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना आपला उमेदवार घोषित केले आहे.


हे देखील वाचा –

भारताचे अंतराळ स्पेस स्टेशन कसे असेल? ISRO ने दाखवली पहिली झलक

‘आधार कार्ड’चा पुरावा ग्राह्य धरावा’, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश; मतदार यादीतून वगळलेल्या मतदारांना मोठा दिलासा

जीएसटीमध्ये आता 4 नव्हे तर फक्त 2 स्लॅब; मंत्रिगटाची मान्यता; वाचा काय होणार स्वस्त