Home / देश-विदेश / TikTok Ban : टिकटॉक अनब्लॉक नाही ! केंद्र सरकारचा खुलासा

TikTok Ban : टिकटॉक अनब्लॉक नाही ! केंद्र सरकारचा खुलासा

TikTok Ban

नवी दिल्ली – भारतात चिनी (Chinese)व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म टिकटॉकची (TikTok)वेबसाइट तब्बल पाच वर्षांनी अचानक अनब्लॉक (accessible) झाली अशी बातमी समजा माध्यमांवर फिरत आहे . या संदर्भात केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, टिकटॉक आणि इतर ५९ चिनी ॲपवरील (TikTok and 59 other Chinese app)बंदी कायम आहे. काही समाजमाध्यमांवर या ॲपवरील बंदी उठवली आहे अशी खोटी बातमी पसरवली जात आहे.

२०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारत-चीन संघर्षानंतर(India-China clash in the Galwan Valley) सरकारने टिकटॉक, वीचॅट, हेलो यांसारख्या ५९ चिनी ॲपवार (WeChat, Helo, and 59 other Chinese apps.)बंदी घातली होती. यापूर्वीच चिनी कंपन्यांच्या गुंतवणुकीवर निर्बंध लादण्यात आले होते. सरकारने स्पष्ट केले होते की, या ॲप्समार्फत वापरकर्त्यांची माहिती चीन सरकारला मिळू शकतो ज्यामुळे भारताच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला धोका निर्माण होतो. तेव्हापासून आजवर भारतात चिनी ॲपवार बंदी घालण्यात आली.

सध्या वापरकर्त्यांना या प्लॅटफॉर्मच्या केवळ होमपेजवरच जाता येते. टिकटॉक आणि अली एक्सप्रेसचे ॲप्स गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) व ॲपल ॲप स्टोअरवर (Apple’s App Store)उपलब्ध नाहीत. शीनचे ॲप इन्स्टॉल करता येते, पण त्यावरील सेवा मर्यादित आहेत.टिकटॉकची मूळ कंपनी बाइटडान्सने (ByteDance,)भारतात वेबसाइट खुली झाल्याबाबत कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. ॲप पुन्हा सुरु होणार का, किंवा वेबसाइट केवळ तात्पुरती खुली आहे का ? यावरही त्यांनी मौन बाळगले आहे. भारत सरकारकडूनही (Indian government)टिकटॉकवरील बंदी उठवण्याचा कोणताही आदेश जारी करण्यात आलेला नाही.