Home / लेख / OpenAI सोबत काम करण्याची संधी, कंपनीने भारतात ‘या’ 3 पदांसाठी सुरू केली कर्मचारी भरती

OpenAI सोबत काम करण्याची संधी, कंपनीने भारतात ‘या’ 3 पदांसाठी सुरू केली कर्मचारी भरती

OpenAI-ChatGPT Jobs in india

OpenAI-ChatGPT Jobs in india: जगप्रसिद्ध AI कंपनी OpenAI आता भारतात आपले स्थान मजबूत करण्याच्या तयारीत आहे. OpenAI चे सीईओ सॅम अल्टमन (Sam Altman) यांनी लवकरच नवी दिल्लीत लवकरच कार्यालय उघडण्याची घोषणा केली आहे.

हे कार्यालय 2025 च्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे भारतात ChatGPT (चॅटजीपीटी) चा विस्तार होण्यास मदत मिळेल

ChatGPT साठी भारत हा जागतिक स्तरावर दुसरी सर्वात मोठा बाजारपेठ आहे. भारतीय नागरिकांकडून अनेक दैनंदिन कामांसाठी चॅटजीटीपीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

या पार्श्वभूमीवर कंपनी भारतावर लक्ष केंद्रीत करत आहे. कंपनीने भारतासाठी नवीन स्वस्त प्लॅन देखील लाँच केला आहे. यासोबतच, कंपनीने भारतात भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

भारतासाठी नवीन भरती सुरू (OpenAI-ChatGPT Jobs in india)

फायनेंशियल एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, भारतातील कामकाजाला गती देण्यासाठी OpenAI ने महत्त्वाच्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये खालील तीन प्रमुख पदांचा समावेश आहे:

  • डिजिटल नेटीव्हसाठी अकाउंट डायरेक्टर
  • मोठ्या उद्योगांसाठी अकाउंट डायरेक्टर
  • स्ट्रॅटेजिकसाठी अकाउंट डायरेक्टर

या पदांवरील व्यक्ती ग्राहकांशी संबंध जपून विविध क्षेत्रांमध्ये OpenAI च्या उत्पादनांचा वापर वाढवण्याचे काम करतील.

भारताचे महत्त्व

सॅम अल्टमन यांनी X (ट्विटर) वर पोस्ट करून म्हटले आहे की, “भारतात पहिले कार्यालय उघडणे आणि स्थानिक टीम तयार करणे हे प्रगत AI ला देशभरात अधिक सुलभ बनवण्याच्या आमच्या वचनबद्धतेमधील एक महत्त्वाचे पाऊल आहे.”

अल्टमन यांनी पुढे सांगितले की, “भारतातील AI चा वापर खूप आश्चर्यकारक आहे. गेल्या एका वर्षात ChatGPT वापरकर्त्यांची संख्या 4 पटीने वाढली आहे. आम्ही भारतात अधिक गुंतवणूक करण्यास उत्सुक आहोत!”

दरम्यान, OpenAI ने भारतात 399 रुपये प्रति महिना किमतीचा ‘ChatGPT Go’ हा स्वस्त सबस्क्रिप्शन प्लॅनही (subscription plan) सुरू केला आहे. त्यामुळे चॅटजीटीपी वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.


हे देखील वाचा –

सरकारचा मोठा निर्णय; 20 वर्षांपेक्षा जुनी गाडी वापरता येणार; मात्र मोजावे लागतील जास्त पैसे

PAN Card हरवले? आता फक्त 5 मिनिटांत घरी बसून करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

भारताचे अंतराळ स्पेस स्टेशन कसे असेल? ISRO ने दाखवली पहिली झलक