Home / महाराष्ट्र / ‘लाडकी बहीण’ योजनेला फसवणुकीचे ग्रहण; अपात्र लाभार्थींमुळे सरकारला बसला 163 कोटींचा फटका

‘लाडकी बहीण’ योजनेला फसवणुकीचे ग्रहण; अपात्र लाभार्थींमुळे सरकारला बसला 163 कोटींचा फटका

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana: राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) या महत्त्वाकांक्षी योजनेला आता गैरव्यवहाराचे ग्रहण लागले आहे. RTI अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, जुलै 2024 ते जुलै 2025 या एका वर्षाच्या काळात अपात्र लाभार्थ्यांना 163 कोटी रुपयांचे वाटप झाल्याचे समोर आले आहे.

यामध्ये महिलाच नाही, तर पुरुषांनीही योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे, ज्यामुळे सरकारवर जोरदार टीका होत आहे.

आउटलूकने दिलेल्या वृत्तानुसार, माहिती अधिकार कार्यकर्ते अजय बोस यांनी दाखल केलेल्या अर्जानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या योजनेचा उद्देश 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा 1,500 रुपये देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा होता. मात्र, अनेक पात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात आले, तर दुसरीकडे अपात्र व्यक्तींनी याचा गैरफायदा घेतला.

योजनेतील त्रुटी आणि गैरव्यवहार

रिपोर्टनुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्ह्यातच 1.04 लाख अर्ज अपात्र ठरवण्यात आले, ज्यात 84,000 अर्ज कुटुंबातील महिलांची संख्या जास्त असल्यामुळे आणि 20,000 अर्ज वयाचा निकष पूर्ण न केल्यामुळे रद्द झाले.

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः या गोष्टीला दुजोरा दिला असून, 26.34 लाख अपात्र लाभार्थ्यांना तात्पुरते निलंबित करण्यात आल्याचे सांगितले आहे. काही प्रकरणांमध्ये कुटुंबातील दोनापेक्षा अधिक महिलांनी, तर काहींनी सरकारी कर्मचारी असूनही लाभ घेतल्याचे समोर आले आहे.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, 14,000 हून अधिक पुरुषांनी बनावट कागदपत्रे वापरून योजनेचा लाभ घेतला. यामुळे राज्याच्या तिजोरीवर 21.44 कोटी रुपयांचा भार पडला. अशाप्रकारे अपात्र व्यक्तींना योजनेचा लाभ घेल्याने विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.


हे देखील वाचा –

श्रेयस अय्यरने कर्णधारपदाची ऑफर नाकारली; ‘या’ कारणामुळे घेतला मोठा निर्णय

बाईक रॅलीदरम्यान तरूणाकडून राहुल गांधींना किस करण्याचा प्रयत्न, तेवढ्या सुरक्षा रक्षकाने… व्हिडिओ व्हायरल

’10 ते 15 लाख रुपये घेऊन…’; लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंवर ‘फंडिंग’चा आरोप

9 कॅरेट सोने नक्की काय आहे? किंमत-शुद्धेपर्यंत जाणून घ्या संपूर्ण माहिती