Elphinstone Bridge colse – गणेशोत्सव (Ganeshotsav festivities) संपल्यानंतर एल्फिन्स्टनचा पूल (Elphinstone Bridge)पाडला जाणार आहे. त्यामुळे १० सप्टेंबरपासून हा ब्रिटिशकालीन पूल (British-era bridge)वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे,अशी माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.
एल्फिन्स्टन पूल पाडून डबलडेकर पूल उभारण्यात येणार आहे.याआधी या पुलामुळे बाधित होणाऱ्या इमारतींमधील रहिवाशांनी एल्फिन्स्टनमध्येच पुनवर्सनाची मागणी करत पूल पाडण्यास (demolition) तीव्र विरोध केला होता.त्यामुळे पुलाचे पाडकाम लांबणीवर पडले होते.मात्र आता अनंत चतुदर्शीनंतर तीन दिवसांनी हा पूल बंद केला जाईल. सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता हा पूल लवकरात लवकर पाडण्याची आवश्यकता आहे.
मात्र, गणेशोत्सवात या भागात वाहतूक कोंडी होईल हे लक्षात घेऊन १० सप्टेंबरपासून पूल बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे वाहतूक विभागाने म्हटले आहे. अटल सेतूवरून येणा-या वाहनांना थेट वरळी आणि वांद्र्याच्या दिशेने प्रवास करणे सोपे व्हावे यासाठी १२५ वर्षे जुना एल्फिस्टन पूल तोडून एमएमआरडीए डबलडेकर पुलाची उभारणी करणार आहे.परळ (Parel),शिवडी(Shivdi), प्रभादेवी(Prabhadevi),वरळी (Worli) या भागांसाठी हा पूल अत्यंत महत्वाचा आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
१ सप्टेंबरपासून सांगली महापालिकेचे कामकाज ऑनलाइन