Home / News / राष्ट्रवादीत भाजप कार्यकर्ता नको ! मावळचे आमदार शेळकेंचे विधान

राष्ट्रवादीत भाजप कार्यकर्ता नको ! मावळचे आमदार शेळकेंचे विधान

BJP Karykarta Not Welcome in NCP: Maval MLA Shelke’s Statement

BJP Karykarta Not Welcome in NCP: Maval MLA Shelke’s Statement

BJP Karykarta Not Welcome in NCP स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (local body elections) निवडणुका जवळ येत असताना महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या(Ajit Pawar) राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके (MLA Sunil Shelke)यांनी कार्यकर्त्यांना सल्ला देताना निवडणूक महायुतीत (Mahayuti)लढवा, पण भाजपाच्या एकाही कार्यकर्त्याला पक्षात घेऊ नका असे वक्तव्य केले.

राष्ट्रवादीतर्फे वडगाव मावळ येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. तळेगाव दाभाडे नगराध्यक्षपदाबाबत विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.

सुनील शेळके म्हणाले, की तळेगाव नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून मी भाजपच्या कार्यकर्त्याचे नाव घेतले, तर विरोधकांनी राष्ट्रवादीकडे उमेदवार नाही म्हणून मी भाजपच्या कार्यकर्त्याचे नाव दिले, असा आरोप केला. विरोधकांनी आता उमेदवाराचे नाव जाहीर करावे आणि पुन्हा एकदा मैदानात उतरून बघावे. महायुतीत लढवा पण भाजपाच्या एकाही कार्यकर्त्याला पक्षात घेऊ नका.

राष्ट्रवादीच्या सर्व सेलचे पदाधिकारी, विभागाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या पाहिजेत. फक्त पदे घेऊन बसू नका, काम करा. जबाबदाऱ्या पेलता आल्या नाहीत, तर पदे अडवून ठेवण्यापेक्षा स्वतःहून बाजूला व्हा, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.


 ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

१ सप्टेंबरपासून सांगली महापालिकेचे कामकाज ऑनलाइन

SBI Clerk Recruitment 2025: एसबीआयमध्ये 6,589 पदांची भरती; अर्ज करण्याची आज शेवटची संधी, जाणून घ्या माहिती

पंतप्रधान मोदींच्या हस्ते Maruti Suzuki e-Vitara लाँच, 100 देशात होणार निर्यात; जाणून घ्या किंमत-फीचर्स