Home / महाराष्ट्र / MPSC Questions: एमपीएससीने पहिल्यांदाच तब्बल बारा प्रश्न रद्द केले

MPSC Questions: एमपीएससीने पहिल्यांदाच तब्बल बारा प्रश्न रद्द केले

MPSC

MPSC Questions – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission) ढिसाळ नियोजनाचा आणखी एक नमुना समोर आला आहे. आयोगाने गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त (मुख्य) परीक्षा–२०२४ ची अंतिम (Examination–2024)उत्तरतालिका जाहीर करताना तब्बल १२ प्रश्न (12 questions) रद्द केले आहेत.

तर दोन प्रश्नांचे पर्याय बदलले आहेत. एकूण १४ प्रश्नांमध्ये झालेल्या बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर मोठा परिणाम होणार असून राज्यातील हजारो उमेदवार (candidates) चिंतेत सापडले आहेत.

२९ जून २०२५ रोजी ही परीक्षा झाली होती. प्रथम उत्तरतालिकेवर विद्यार्थ्यांनी नोंदवलेल्या हरकती व तज्ञांचे अभिप्राय लक्षात घेऊन आयोगाने अंतिम उत्तरतालिका निश्चित केली. मात्र आता या उत्तरतालिकेविषयी कोणतेही निवेदन किंवा पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रश्न रद्द होण्याची ही एमपीएससीच्या इतिहासातील पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप असून एमपीएससी सारख्या महत्त्वाच्या संस्थेकडून इतक्या गंभीर चुका होत असतील तर आम्ही दाद कुठे मागावी? असा सवाल उमेदवारांकडून उपस्थित केला जात आहे.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

एल्फिन्स्टन पूल अखेर १० सप्टेंबरपासून बंद

SBI Clerk Recruitment 2025: एसबीआयमध्ये 6,589 पदांची भरती

महादेवी हत्ती प्रकरणानंतर ‘वनतारा’च्या अडचणी वाढणार?