Michael Clarke Cancer: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने (Michael Clarke) त्याला कॅन्सर झाल्याची माहिती दिली आहे.त्याने नुकतीच त्वचेच्या कर्करोगासाठी सहावी शस्त्रक्रिया केली आहे.
44 वर्षीय क्लार्कने 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय विश्वचषक जिंकून दिला होता. त्याने इंस्टाग्रामवर शस्त्रक्रियेनंतरचा फोटो शेअर करत चाहत्यांना त्वचेची तपासणी नियमितपणे करण्याचा सल्ला दिला आहे.
क्रिकेटच्या मैदानावर खेळाडू प्रतिस्पर्धी संघाशी सामना जिंकण्याठी झुंज देताना पाहायला मिळतात. पण काही खेळाडूंना मैदानाबाहेर कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराशीही लढावे लागले.
मैदानाबाहेर कॅन्सरशी लढा देणारे क्रिकेटपटू
मायकेल क्लार्क: क्लार्कला 2006 मध्ये पहिल्यांदा त्वचेचा कर्करोग झाला होता. त्यानंतर त्याने अनेक शस्त्रक्रिया करून घेतल्या आहेत. 2019 मध्ये त्याच्या कपाळावरून तीन गाठी काढण्यात आल्या होत्या. 2023 मध्ये त्याच्या छातीवरील गाठ काढण्यासाठी त्याला 27 टाके पडले होते.
युवराज सिंग: भारताचा वर्ल्ड कप हिरो युवराज सिंग (Yuvraj Singh) याने कॅन्सरवर मात करून एक प्रेरणादायी पुनरागमन केले. 2011 च्या विश्वचषकात त्याने सर्वोत्तम कामगिरी केली होती, तेव्हा त्याला फुफ्फुसाचा दुर्मिळ कर्करोग असल्याचे निदान झाले होते. त्याने अमेरिकेत केमोथेरपी घेतली आणि 2012 मध्ये पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.
अँडी फ्लॉवर: 2010 मध्ये इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक असताना झिम्बाब्वेचे माजी कर्णधार अँडी फ्लॉवर यांना त्यांच्या उजव्या गालावर त्वचेचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. शस्त्रक्रियेनंतर ते पूर्णपणे बरे झाले आणि आता ते त्वचेच्या कर्करोगाबद्दल जागरूकता निर्माण करतात.
रिची बेनॉड: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार आणि कॉमेंटेटर रिची बेनॉड यांनाही उतारवयात त्वचेचा कर्करोग झाला होता. या आजाराची माहिती दिल्यानंतर काही महिन्यांतच 10 एप्रिल 2015 रोजी त्यांचे निधन झाले.
जिऑफ्री बॉयकॉट: इंग्लंडचे माजी सलामीवीर जिऑफ्री बॉयकॉट यांना 2003 मध्ये घशाचा कर्करोग झाला होता. 35 रेडिओथेरपी सेशननंतर ते पूर्णपणे बरे झाले आणि एका वर्षाच्या आत कॉमेंट्रीसाठी परतले.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
PM SVANidhi Yojana: आता 50,000 रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज मिळणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Ganeshotsav 2025 : रील बनवा आणि 1 लाखांपर्यंतचे रोख बक्षीस जिंका; महाराष्ट्र सरकारची अनोखी स्पर्धा
1 सप्टेंबरपासून लागू होणार 5 मोठे बदल; तुमच्या बजेटवर थेट परिणाम होण्याची शक्यता