Ganeshotsav Viral Video: महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गणेशोत्सव (Ganeshotsav 202) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पुढील 10 दिवस गणरायाची भक्तीभावाने पुजा केली जाईल. यातच एक अनोखा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये (Ganeshotsav Viral Video) गणपतीच्या मूर्तीवर एक मांजर शांतपणे झोपलेली दिसत आहे. जणू काही तिला बाप्पाच्या कुशीत सर्वात सुरक्षित आणि शांत ठिकाण मिळाले आहे.
एका इंस्टाग्राम यूजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी गणेशोत्सवातील सर्वात सुंदर व्हिडिओ असल्याचे म्हटले आहे.
व्हिडीओमध्ये काय आहे?
गणपतीच्या विक्री करणाऱ्या स्टॉलवरील हा व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये गणरायाच्या मुर्तीच्या एक हातावर मांजर अगदी आरामात झोपल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया देखील दिल्या. एका यूजरने लिहिले की, “आज इंटरनेटवरील सर्वात सुंदर व्हिडीओ.”, तर आणखी एकाने लिहिले की, मांजर सर्वात सुरक्षित ठिकाणी झोपली आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
PM SVANidhi Yojana: आता 50,000 रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज मिळणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Ganeshotsav 2025 : रील बनवा आणि 1 लाखांपर्यंतचे रोख बक्षीस जिंका; महाराष्ट्र सरकारची अनोखी स्पर्धा
1 सप्टेंबरपासून लागू होणार 5 मोठे बदल; तुमच्या बजेटवर थेट परिणाम होण्याची शक्यता