Home / लेख / iPhone 17 सीरिजचा लाँचिंगचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी होणार Apple चा मोठा इव्हेंट

iPhone 17 सीरिजचा लाँचिंगचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी होणार Apple चा मोठा इव्हेंट

iPhone 17 Series Launch

iPhone 17 Series Launch: बहुप्रतिक्षित iPhone 17 सीरिज लवकरच लाँच होणार आहे. ॲपलने अखेर आपल्या वार्षिक लाँच इव्हेंटची तारीख जाहीर केली आहे.

येत्या 9 सप्टेंबरला ॲपल आपला पुढील फ्लॅगशिप iPhone 17 सीरिज लाँच करणार आहे. विशेष म्हणजे, या सीरिजमध्ये पहिल्यांदाच ‘iPhone 17 Air’ हे नवीन मॉडेल सादर होण्याची शक्यता आहे.ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वरून ही घोषणा केली.

हा कार्यक्रम कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथील ॲपल पार्क येथे होणार आहे. या इव्हेंटमध्ये काहीतरी नवीन लाँच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा कार्यक्रम 9 सप्टेंबर रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता थेट प्रक्षेपित केला जाईल.

Apple इव्हेंट 2025 मध्ये काय अपेक्षित आहे?

या इव्हेंटमध्ये iPhone 17, iPhone 17 Pro, आणि iPhone 17 Pro Max या नियमित मॉडेल्ससह अनेक मोठे अपग्रेड अपेक्षित आहेत.

iPhone 17 Air: यंदा ॲपल आपल्या ‘प्लस’ व्हेरियंटच्या जागी नवा iPhone 17 Air आणू शकतो. हा फोन 5.5mm जाडीसह आतापर्यंतचा सर्वात स्लिम iPhone असेल, असा अंदाज आहे. मात्र, यामुळे त्याची बॅटरी क्षमता सुमारे 2,900mAh पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.

प्रो मॉडेल्स: iPhone 17 Pro आणि 17 Pro Max मध्ये कॅमेरा मॉड्यूलची रचना बदललेली असू शकते. या प्रो मॉडेल्समध्ये 8X टेलीफोटो कॅमेरा असण्याचीही शक्यता आहे.

प्रोसेसर: iPhone 17 आणि 17 Air मध्ये ॲपलचा नवीनतम A19 चिपसेट असेल, तर प्रो मॉडेल्समध्ये उच्च-एंड A19 Pro चिपसेट दिला जाण्याची अपेक्षा आहे.

iPhone 17 सिरीजची अंदाजित भारतीय किंमत

  • या वर्षी iPhone 17 सीरिजची किंमत iPhone 16 सीरिजच्या तुलनेत वाढू शकते.
  • iPhone 17 ची किंमत भारतात सुमारे 79,990 रुपये पासून सुरू होऊ शकते.
  • iPhone 17 Air ची किंमत सुमारे 89,990 रुपये असू शकते.
  • iPhone 17 Pro ची किंमत सुमारे 1,34,990 रुपये आणि 17 Pro Max ची किंमत सुमारे 1,64,990 रुपये असण्याचा अंदाज आहे.

नवीन iPhones व्यतिरिक्त, ॲपल या इव्हेंटमध्ये Apple Watch Series 11, AirPods Pro 3 आणि Apple Watch Ultra ची नवीन पिढी देखील लाँच करू शकते. लाँचनंतर नवीन आयफोनच्या किंमत आणि फीचर्सचा खुलासा होईल.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबई पोलिसांना दिले 20 आश्वासनांचे हमीपत्र, जाणून घ्या काय आहेत अटी-शर्ती

गणेशोत्सवाचा इतिहास: छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे आणि टिळकांनी सुरू केलेली ही परंपरा कशी बनली महाराष्ट्राचा अभिमान? जाणून घ्या

Ganeshotsav 2025 : रील बनवा आणि 1 लाखांपर्यंतचे रोख बक्षीस जिंका; महाराष्ट्र सरकारची अनोखी स्पर्धा