Home / News / आसाराम बापूचा अंतरिम जामीन मुदतवाढीस हायकोर्टाचा नकार! ३० ऑगस्टपर्यंत पुन्हा कारागृहात रवानगी

आसाराम बापूचा अंतरिम जामीन मुदतवाढीस हायकोर्टाचा नकार! ३० ऑगस्टपर्यंत पुन्हा कारागृहात रवानगी

Asaram's Bail Extension Denied

Asaram Bapu’s Interim Bail Extension Denied by High Court! Sent Back to Jail Until August 30

Asaram’s Bail Extension Deniedजोधपूरमध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या(Asaram bapu) आसाराम बापूला राजस्थान उच्च न्यायालयाने (Rajasthan high court)मोठा दणका दिला आहे. न्यायालयाने त्याचा अंतरिम जामीन(Interim bail) कालावधी वाढवण्यास नकार दिला आहे. अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या वैद्यकीय अहवालाच्या आधारे हा निर्णय देण्यात आला. त्यामुळे आता आसारामला ३० ऑगस्टपर्यंत जोधपूर मध्यवर्ती कारागृहात आत्मसमर्पण करावे लागणार आहे.

वैद्यकीय अहवालानुसार, सध्या आसारामची प्रकृती तुरुंगात राहण्यासाठी योग्य आहे. हा आदेश राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिनेश मेहता आणि न्यायमूर्ती विनीत कुमार माथुर यांच्या पीठाने दिला. न्यायालयाने म्हटले, की भविष्यात त्याच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाला, तर तो पुन्हा जामिनासाठी अर्ज करू शकेल. मात्र सध्या तो स्वस्थ आहे आणि त्याला तुरुंगात परत जाऊन शिक्षा भोगणे आवश्यक आहे.

याआधी, १२ ऑगस्ट रोजीही आसारामने जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावेळी न्यायालयाने वैद्यकीय अहवालाच्या आधारे २९ ऑगस्टपर्यंत जामिनाची मुदत वाढवली होती, मात्र यावेळी कोर्टाने थेट आत्मसमर्पणाचा आदेश दिला आहे. भविष्यात आसारामला कोणतीही गंभीर आरोग्य समस्या उद्भवली, तर नवीन वैद्यकीय अहवालाच्या आधारावर तो पुन्हा जामिनासाठी अर्ज करू शकतो. सध्याचा आदेश स्पष्ट संकेत देतो, की तो आता तुरुंगाबाहेर राहू शकणार नाही आणि ठरलेल्या वेळेत आत्मसमर्पण करणे अनिवार्य आहे.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

पाकिस्तानच्या आयएसआयचा संघ मुख्यालयावर हल्ल्याचा कट ! भारताच्या केंद्रीय सुरक्षा यंत्रणांना मिळाली माहिती

15 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणारे बेस्ट लॅपटॉप; वाचा फीचर्स आणि किंमत

गणेशोत्सवाचा इतिहास: छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे आणि टिळकांनी सुरू केलेली ही परंपरा कशी बनली महाराष्ट्राचा अभिमान? जाणून घ्या