Virar Building collapsed – विरार पूर्वमधील नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट (Ramabai Apartment) या चार मजली इमारतीचा काही भाग कोसळून (Virar Building collapsed) भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल १७ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक वर्षाची उत्कर्षा जोवील (utkarsha jovial) आणि तिची आई आरोही जोवील (Arohi jovial)(२४) यांचाही (Daughter-mother death) समावेश आहे. मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या या अपघातस्थळाला आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आज भेट देऊन पाहणी केली. यावेळी आमदार राजन नाईक (MLA Rajan Naik) व आमदार स्नेहा दुबे(MLA Sneha Dubey) ही उपस्थित होते. मृतांच्या वारसांना राज्य सरकारने (state government) ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
रमाबाई अपार्टमेंटमध्ये एकूण ५० सदनिका होत्या. त्यापैकी अंदाजे १२ सदनिका या अपघातात कोसळल्या व शेजारील चाळ उद्ध्वस्त झाली. अनेक कुटुंबे मलब्याखाली दबली. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक व वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाने युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू केले. जेसीबी यंत्रे आत शिरू शकत नसल्याने अडथळे आले, मात्र शेजारची चाळ पाडल्यामुळे मदत कार्याला वेग आला. बचाव कार्यातून आतापर्यंत २६ जणांना बाहेर काढण्यात आले, त्यापैकी १७ जणांचा मृत्यू झाला असून ९ जणांवर उपचार सुरू आहेत.
मृतांमध्ये आरोही जोवील (२४), उत्कर्षा जोवील (१), लक्ष्मण किसकु सिंग (२६), दिनेश सकपाळ (४३), सुप्रिया निवळकर (३८), अर्णव निवळकर (११), पार्वती सकपाळ (६०), दिपेश सोनी (४१), सचिन नेवाळकर (४०), हरिश सिंग बिष्ट (३४), सोनाली रुपेश तेजाम (४१), दिपक सिंग बोहरा (२५), कशिश पवन सहेनी (३५), शुभांगी पवन सहेनी (४०), गोविंद सिंग रावत (२८) यांचा समावेश आहे. आणखी दोन मृतांची ओळख पटलेली नाही. जखमींमध्ये विशाखा जोवील (२४) , प्रभावकर (५७), मिताली परमार (२८), संजय स्वपंत सिंग (२४), प्रेरणा शिंदे (२०), प्रमिला शिंदे (५०), मंथन शिंदे (१९), प्रदीप कदम (४०), जयश्री कदम (३३) यांचा समावेश असून त्यांच्यावर वसई, नालासोपारा व विरार येथील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यापैकी ३ जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडले आहे. आणखी ६ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर वसई-विरार महापालिकेने इमारत बांधणाऱ्या बिल्डरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नितल गोपीनाथ साने या बांधकाम व्यावसायिकाला विरार पोलिसांनी अटक केली असून जागेच्या मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. शासनाने त्या इमारतीला एक महिन्यापूर्वी नोटीस दिली होती. त्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगितले होते. या घटनेमधील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे.
पहिला वाढदिवस
ठरला शेवटचा
२६ ऑगस्ट हा उत्कर्षाचा पहिलाच वाढदिवस होता. दिवसभर कुटुंबीय व नातेवाईकांसोबत आनंदात हा दिवस साजरा करण्यात आला होता. चौथ्या मजल्यावरील त्यांच्या घरी छोटेखानी कार्यक्रम आयोजित झाला. उत्साहात केक कापण्यात आला, एकमेकांना तो भरवण्यात आला, हशा आणि आनंदाचे वातावरण होते. पण, वाढदिवसाचा हा आनंद क्षणिक ठरला. रात्री उशिरा रमाबाई अपार्टमेंटचा काही भाग कोसळला आणि मायलेकींचे आयुष्य संपले. उत्कर्षा आणि तिची आई आरोहीचा मृत्यू झाला.
हे देखील वाचा–
आता विद्यार्थ्यांचे आधार कार्डशाळेतून अपडेट करता येणार