FIR Filed Against Shah Rukh Khan, Deepika Padukone and Six Hyundai Officials for Alleged Fraud
FIR Filed Against SRK & Deepika Padukone – बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan)आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone)यांच्यासह हुंडई कंपनीच्या (Hyundai Motors)सहा जणांविरोधात राजस्थानमधील भरतपूर येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात भरतपूर(Bharatpur)येथील वकील कीर्ती सिंग यांनी सीजेएम न्यायालयात याचिका दाखल केली होती.
कीर्ती सिंग यांनी २०२२ मध्ये हरियाणामधून तब्बल २३ लाख ९७ हजार रुपयांना हुंडई कंपनीची कार खरेदी केली होती. गाडी खरेदी केल्यानंतर केवळ सहा-सात महिन्यांतच त्या वाहनात गंभीर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्याबद्दल वारंवार तक्रार केली असता कंपनीकडून मॉडेलमध्ये दोष असल्यामुळे काहीही करता येणार नाही, असे सांगण्यात आले.
याबाबत सिंग यांनी भरतपूर न्यायालयात याचिका दाखल केली. यामध्ये कंपनीने दोषपूर्ण वाहन विकून फसवणूक व विश्वासघात केला असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि ब्रँड अॅम्बेसिडर यांनी मिळून फौजदारी कट रचल्याचा दावा करण्यात आला.
फिर्यादीच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला, की जाहिरातींमधून ग्राहकांना चुकीची माहिती देण्यात आली. ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत हे कृत्य फसवणूक ठरते. सर्वोच्च न्यायालयाने २०२४ मध्ये दिलेल्या निकालात चुकीच्या किंवा भ्रम निर्माण करणाऱ्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींनाही जबाबदार धरण्यात येईल, असा स्पष्ट आदेश दिला होता. त्यामुळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. यावर न्यायालयाने हे दोघेही चुकीची जाहिरात करण्यासंदर्भात तितकेच जबाबदार असतील, असा आदेश दिला आहे.
भरतपूर न्यायालयाने आदेश दिल्यानंतर माथुरा गेट पोलीस ठाण्यात शाहरुख आणि दीपिका यांच्यासह हुंडई मोटार्स इंडिया लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक व विक्री एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
आसाराम बापूचा अंतरिम जामीन मुदतवाढीस हायकोर्टाचा नकार
नगरसेवक जामसंडेकर हत्या प्रकरण ! अरुण गवळीला सुप्रीम कोर्टात जामीन