Indian Economy : 2038 पर्यंत भारत होणार जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची शक्यता आहे. ईवाय (EY) च्या एका रिपोर्टमध्ये याबाबत संकेत देण्यात आले आहेत.
अहवालानुसार, 2030 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था क्रयशक्ती समानतेच्या (PPP) आधारे 20.7 लाख कोटी डॉलरपर्यंत पोहोचू शकते. तसेच, 2038 पर्यंत भारत 34.2 लाख कोटी डॉलरच्या जीडीपीसह (GDP) जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो.
‘ईवाय इकॉनॉमी वॉच’ (EY Economy Watch) च्या अंकात म्हटले आहे की, जागतिक पातळीवर अनिश्चितता असतानाही, भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या पाच मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून उदयास येत आहे. उच्च बचत आणि गुंतवणुकीचे प्रमाण, अनुकूल लोकसंख्या आणि एक मजबूत वित्तीय स्थिती ही भारताच्या आर्थिक विकासाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
अहवालात म्हटले आहे की, अमेरिकेने भारतीय आयातीवर वाढवलेल्या शुल्काचा भारतीय अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही. योग्य उपाययोजना केल्यास, भारताची वास्तविक जीडीपी वाढ केवळ 0.1% पर्यंत कमी होऊ शकते.
अमेरिकी शुल्काचा भारतावर होणारा परिणाम
अमेरिकेने भारतीय वस्तूंवर 50% शुल्क लागू केले आहे, ज्यामुळे 48 अब्ज डॉलरपेक्षा जास्त मूल्याच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. यामुळे वस्त्रोद्योग, दागिने, कोळंबी, चामड्याचे आणि पादत्राणे, रसायने आणि यंत्रसामग्री यांसारख्या क्षेत्रांवर जास्त परिणाम होणार आहे. मात्र, फार्मा, ऊर्जा उत्पादने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंना या शुल्कातून वगळण्यात आले आहे.
अहवालात असे म्हटले आहे की, जरी अमेरिकेच्या शुल्कामुळे भारताच्या जीडीपीवर 0.9% चा परिणाम होण्याची शक्यता असली, तरी प्रत्यक्षात तो केवळ 0.1% असेल. याचा अर्थ, भारताची 6.5% अपेक्षित वाढ कमी होऊन सरासरी 6.4% पर्यंत होऊ शकते.
दरम्यान, मेरिका 2021-22 पासून भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. 2024-25 मध्ये दोन्ही देशांमधील वस्तूंचा द्विपक्षीय व्यापार 131.8 अब्ज डॉलर होता, ज्यामध्ये भारताची निर्यात 86.5 अब्ज डॉलर आणि आयात 45.3 अब्ज डॉलर होती.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
Maratha Reservation: ‘मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नाही’; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच केले
Mohan Bhagwat: ‘प्रत्येक भारतीय कुटुंबात तीन मुले हवीत’, मोहन भागवत यांचे मोठे विधान