Home / लेख / सर्वात मोठा टीव्ही भारतात लाँच, किंमत तब्बल 30 लाख रुपये; जाणून घ्या वैशिष्ट्ये

सर्वात मोठा टीव्ही भारतात लाँच, किंमत तब्बल 30 लाख रुपये; जाणून घ्या वैशिष्ट्ये

Hisense TV Price

Hisense TV Price: Hisense कंपनीने भारतात त्यांची नवीन UX ULED RGB Mini-LED TV सिरीज लाँच केली आहे. ही सिरीज 100 इंच आणि 116 इंच अशा दोन मोठ्या स्क्रीन साईजमध्ये उपलब्ध आहे.

यातील सर्वात महागड्या 116 इंचाच्या मॉडेलची किंमत 29,99,999 रुपये आहे. या सर्वात महागड्या टीव्हीच्या किमतीत तुम्ही दोन महिंद्रा स्कॉर्पिओ एसयूव्ही (SUV) खरेदी करू शकता. तर, 100 इंचाच्या मॉडेलची किंमत 9,99,999 रुपये आहे.

Hisense TV ची वैशिष्ट्ये

या टीव्हीमध्ये RGB Mini-LED तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. सामान्य मिनी-एलईडी टीव्हीच्या तुलनेत, हे तंत्रज्ञान हजारो डिमिंग झोन्समध्ये स्वतंत्र लाल, हिरवे आणि निळे एलईडी वापरते.

कंपनीच्या दाव्यानुसार, यामुळे 95% BT.2020 कलर कव्हरेज आणि 8,000 निट्सपर्यंतची ब्राइटनेस मिळते. यात HDR10+, डॉल्बी व्हिजन IQ आणि IMAX Enhanced सर्टिफिकेशनसाठी देखील सपोर्ट आहे.

प्रोसेसर आणि इतर वैशिष्ट्ये

या टीव्हीमध्ये Hi-View AI Engine X प्रोसेसर आहे, जो पिक्चर, आवाज आणि वीज वापर रिअल टाइममध्ये समायोजित करतो. या सिस्टीममधील H7 पिक्चर क्वालिटी प्रोसेसरला 2-TOPS NPU चा सपोर्ट आहे, ज्यामुळे चित्र अधिक स्पष्ट आणि सुस्पष्ट दिसते.

यात 3D कलर मास्टर प्रो (3D Colour Master PRO) देखील आहे, जो रंगांची अचूकता सुनिश्चित करतो. तसेच, यात स्मूथ प्लेबॅकसाठी MEMC (मोशन एस्टिमेशन आणि मोशन कंपनसेशन) तंत्रज्ञान देखील उपलब्ध आहे.

दमदार ऑडिओ आणि गेमिंग फीचर्स

ऑडिओसाठी, या टीव्हीमध्ये Devialet च्या सहकार्याने विकसित केलेली 6.2.2 चॅनेलची सिनेस्टेज एक्स सराउंड सिस्टीम आहे. या सिस्टीममध्ये टॉप-फायरिंग स्पीकर आणि एक बिल्ट-इन सबवूफर आहे. यात WiSA SoundSend आणि eARC ला देखील सपोर्ट मिळतो.

गेमिंगसाठी, टीव्हीमध्ये 165Hz गेम मोड अल्ट्रा, एएमडी फ्रीसिंक प्रीमियम प्रो (AMD FreeSync Premium Pro) आणि व्हीआरआर (VRR) सारखी फीचर्स आहेत.

ऑपरेटिंग सिस्टीम आणि उपलब्धता

Hisense UX सिरीज कंपनीच्या VIDAA Smart OS वर चालते. हे 28 भाषांना सपोर्ट करते, ज्यात हिंदीचा देखील समावेश आहे. कंपनी 8 वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट्स देणार आहे आहे. हे टीव्ही Amazon आणि Flipkart सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मसह निवडक ऑफलाइन स्टोअर्समध्ये देखील उपलब्ध असतील.


ताज्या  बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

आता लोकसभा निवडणुका झाल्या तर भाजप-काँग्रेसला किती जागा मिळणार? सर्वेक्षणातून समोर आले आकडे

Mohan Bhagwat: ‘प्रत्येक भारतीय कुटुंबात तीन मुले हवीत’, मोहन भागवत यांचे मोठे विधान

विरारमध्ये इमारत कोसळली! १७ जणांचा मृत्यू तर ९ जखमी