Deputy Chief Minister Ajit Pawar– राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष (NCP)आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज श्रीगोंदा शहरात शेतकरी मेळावा आयोजित केला होता. कांद्याच्या दरवाढीबाबत (onion prices)भाष्य न केल्याच्या कारणावरून संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji Brigade)पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या दिशेने कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे तणावाचे वातावरणात निर्माण झाले. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे (Arvind Kapse) आणि तालुका अध्यक्ष नाना शिंदे (president Nana Shinde) यांना ताब्यात घेतले.
या मेळाव्यात अजित पवार यांनी विविध शासकीय योजनांवर भाष्य केले. मात्र कांद्याच्या खालावलेल्या दरांबाबत कोणताही उल्लेख केला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. कार्यक्रमपूर्वी अनेकांनी कांद्याच्या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची विनंती अजित पवारांकडे केली होती. पण पवारांनी या मुद्याला बगल दिली. त्यामुळे नाराज झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पवारांच्या भाषणानंतर मंचाच्या दिशेने कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतले.
या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अजित पवार यांचा विधानसभा निवडणुकीनंतर पहिलाच श्रीगोंदा दौरा असल्याने राजकीय व सामाजिक वर्तुळाचे याकडे लक्ष लागले होते.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
आता लोकसभा निवडणुका झाल्या तर भाजप-काँग्रेसला किती जागा मिळणार? सर्वेक्षणातून समोर आले आकडे
नगरसेवक जामसंडेकर हत्या प्रकरण ! अरुण गवळीला सुप्रीम कोर्टात जामीन
Maratha Reservation: ‘मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नाही’; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच केले