Uttar Pradesh Dowry- उत्तर प्रदेशातील अमरोहा (Amroha)येथे हुंड्यांची (Dowry)मागणी पूर्ण न झाल्याने विवाहितेला अॅसिड (acid) प्यायला लावले. ही घटना ११ ऑगस्ट रोजी घडली होती. यातील पीडितेचा १७ दिवसांनी मृत्यू झाला. गुल फिजा (Gul Fiza) असे मृत महिलेचे नाव आहे.
तिचा एक वर्षांपूर्वी परवेज या तरुणाशी विवाह झाला होता. तो अमरोहाच्या दिदौली कोतवालीमधील काला खेडा गावातील रहिवासी आहे. लग्न ठरल्यापासून परवेज आणि त्याचे कुटुंबीय गुल फिजाच्या कुटुंबाकडे हुंड्याची मागणी करत होते. लग्नानंतरही ते हुंड्यासाठी गुल फिजाचा छळ करत होते. ११ ऑगस्ट रोजी सासरच्यांनी गुल फिजाला जबरदस्तीने अॅसिड प्यायला लावले, असा आरोप तिच्या वडिलांनी केला. यानंतर गुल फिजाची तब्येत बिघडली. तिला गंभीर अवस्थेमध्ये रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु असताना १७ दिवसांनी तिची प्राणज्योत मालावली.
या प्रकरणी गुल फिजाच्या वडिलांनी तिच्या सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी परवेज, त्याची आई, वडील आणि त्याच्या कुटुंबातील अन्य लोकांविरुद्ध हुंड्यासाठी छळ, मारहाण आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला. गुल फिजाच्या मृत्यूनंतर हत्येचा गुन्हाही जोडण्यात आला.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
Indian Economy : 2038 पर्यंत भारत होणार जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, EY चा अहवाल
Mohan Bhagwat: ‘प्रत्येक भारतीय कुटुंबात तीन मुले हवीत’, मोहन भागवत यांचे मोठे विधान
फडणवीस एक जातीय नेते होण्याचा प्रयत्न करत आहेत ! राऊतांचा आरोप