Uddhav Thackeray – उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी (Vice Presidential election)मतांची जुळवाजुळव सुरू झाली असून इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी हे (Sudarshan Reddy)आज मुंबई दौऱ्यावर आले. त्यांनी मातोश्री निवासस्थानी उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मला फोन केला, तसा मीच त्यांना फोन करून बी. सुदर्शन रेड्डींना पाठिंबा द्या, मतदान करा, असे सांगणार आहे. आमच्यात चमत्कार घडवण्याची ताकद आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत लगावला.
इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सुदर्शन रेड्डी जी ह्यांनी आज मातोश्रीवर पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतली.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 29, 2025
ह्यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत जी, शिवसेना नेते खासदार अनिल देसाई जी, शिवसेना उपनेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी जी, काँग्रेसचे… pic.twitter.com/GKdX2N2P3y
या भेटीनंतर बी. सुदर्शन रेड्डी हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भेट घेणार होते. पण मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे शरद पवार हे चव्हाण सेंटरपर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे रेड्डींनी शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ(Harsvardhan Sapkal), मुंबई अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, की सध्या देश एका विचित्र परिस्थितीतून जात आहे. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक देशासाठी महत्त्वाची आहे. याआधीचे उपराष्ट्रपती अचानक राजीनामा देऊन गेले, पण खरे कारण समोर आले नाही. आवश्यक संख्याबळ नसले तरी देश वाचवण्यासाठी आम्ही लढत आहोत. संख्याबळावरच निवडणूक अवलंबून असती तर निवडणुकीची गरजच नव्हती. या निवडणुकीत गोपनीयता आहे. चमत्कार घडवण्याची ताकद आमच्यात आहे. देशप्रेम छुप्या पद्धतीने असलेले लोक इंडिया आघाडीला मदत करतील. चमत्काराला व्याख्या किंवा आकार नसतो.
ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मला फोन केला, ही गोष्ट सत्य आहे. माझा पक्ष फोडला, चोरला आणि आता पाठिंबा मागत आहेत. याचा काय अर्थ होतो? राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवेळी कोणी मागणी केली नव्हती, तरी आम्ही पाठिंबा दिला होता. ‘गरज असेल तेव्हा वापरा आणि नंतर फेकून द्या’, ही पद्धत आम्ही मान्य करणार नाही. उलट मीच फडणवीस यांना फोन करून बी. सुदर्शन रेड्डी यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती करणार आहे.
सुदर्शन रेड्डी म्हणाले, की मी विरोधी पक्षाकडून उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उद्धव ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी मी मातोश्रीवर आलो. त्यांनी यापूर्वीच मला पाठिंबा जाहीर केला होता. त्याच्या साथीशिवाय हे शक्य नव्हते. मातोश्रीवर आल्यावर लक्षात आले की देशहिताचे आणि महाराष्ट्रहिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी झाले आहेत.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
फडणवीस एक जातीय नेते होण्याचा प्रयत्न करत आहेत ! राऊतांचा आरोप
Mohan Bhagwat: ‘प्रत्येक भारतीय कुटुंबात तीन मुले हवीत’, मोहन भागवत यांचे मोठे विधान
Indian Economy : 2038 पर्यंत भारत होणार जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, EY चा अहवाल