Supreme Court to Hear Bihar Voter Registration Extension Plea on Sept 1
SC to Hear Bihar Voter List Plea Sept 1 – बिहारमध्ये(Bihar) सुरू असलेल्या मतदार नोंदणीसाठी दावे आणि आक्षेप दाखल करण्यास मुदतवाढ देण्याच्या मागणीसंदर्भात राष्ट्रीय जनता दल (RJD) ने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात(SC) १ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
या सुनावणीवेळी न्या. सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर वकील प्रशांत भूषण यांनी सांगितले, की सध्याची १ सप्टेंबरची अंतिम मुदत एक आठवड्याने वाढवण्यात यावी. याबाबत इतर दोन पक्षांनीही अशाच प्रकारच्या याचिका दाखल केल्या आहेत. (Voter Registration Extension)यावर न्या. सूर्यकांत यांनी ही मागणी प्रथम निवडणूक आयोगाकडे का नेली नाही? असा सवाल केला. त्यावर भूषण म्हणाले की, पक्षांनी आयोगाकडे विनंती केली होती. पण आयोगाने मुदतवाढ नाकारली. तर वकील निजाम पाशा यांनी न्यायालयात सांगितले, की पूर्वीच्या न्यायालयीन आदेशापूर्वी तीन आठवड्यांत सुमारे ८० हजार दावे सादर झाले होते तर त्या आदेशानंतर एका आठवड्यात ९५ हजार दावे सादर झाले.
न्यायालयाने आधार व निवडणूक आयोगाच्या मान्यताप्राप्त कागदपत्रांचा वापर करण्याचा आदेश देऊन ६५ लाख गहाळ मतदारांची नावे जाहीर करण्याचेही आदेश दिले आहेत. आयोगाने आधी जाहीर केलेल्या कागदपत्रांमध्ये मतदार यादी शुद्ध करण्यासाठी आधार, मतदार, रेशन कार्ड यांचा समावेश नव्हता.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
मीच देवेंद्र फडणवीसांना फोनवर रेड्डींना पाठिंबा देण्यास सांगणार ! उद्धव ठाकरेंचा टोला
मराठवाड्यात तुफान पाऊस अनेक गावांमध्ये पाणी शिरले
श्रीगोंद्यात अजित पवारांच्या दिशेने कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न