Home / क्रीडा / वसीम अक्रम की बुमराह; कोण सर्वोत्तम गोलंदाज? पाकिस्तानचा क्रिकेटपटू म्हणाला…

वसीम अक्रम की बुमराह; कोण सर्वोत्तम गोलंदाज? पाकिस्तानचा क्रिकेटपटू म्हणाला…

wasim akram jasprit bumrah

Jasprit Bumrah: पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने (Wasim Akram) भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद सिराजचे (Mohammed Siraj) तोंडभरून कौतुक केले आहे.

वसीम अक्रम आणि जसप्रीत बुमराह यांची अनेकदा तुलना केली जाते. तसेच, दोघांपैकी कोण सर्वोत्तम गोलंजाज? असाही प्रश्न विचारला जातो. या चर्चेवर आता वसीम अक्रमने उत्तर दिली आहे.

बुमराह सर्वोत्तम गोलंदाज

जसप्रीत बुमराहची तुलना वसीम अक्रम यांच्याशी केली जाते, याबद्दल विचारले असता अक्रमने सांगितले की, “जसप्रीत बुमराह एक अद्भुत गोलंदाज आहे. त्याची गोलंदाजीची शैली थोडी वेगळी आहे, पण त्यात प्रचंड वेग आहे. बीसीसीआयने ज्या पद्धतीने त्याला सांभाळले आहे, त्याचे श्रेय त्यांना जाते.”

तो पुढे म्हणाला की, “1990 च्या दशकातील गोलंदाजांची आताच्या गोलंदाजांशी तुलना करणे अशक्य आहे. मी डावखुरा होतो, तर तो उजव्या हाताने गोलंदाजी करतो. ही सोशल मीडियावरील चर्चा आहे.

मला किंवा त्याला या गोष्टीची काहीही पर्वा नाही. तो आधुनिक युगातील एक महान गोलंदाज आहे. मी माझ्या काळात चांगले काम केले, तो त्याच्या काळात उत्तम कामगिरी करत आहे. तो खरोखरच खूप प्रभावी गोलंदाज आहे.”, असे म्हणत अक्रमने बुमराहचे कौतुक केले.

सिराजच्या कामगिरीवर अक्रम प्रभावित

याशिवाय, वसीम अक्रम यांनी इंग्लंडमध्ये मोहम्मद सिराजच्या अलीकडील कामगिरीचे कौतुक केले. एका मुलाखतीत तो म्हणाला की, “जेव्हा मी कामावर नसतो तेव्हा फार कमी क्रिकेट पाहतो, पण इंग्लंडमधील सामन्याच्या शेवटच्या दिवशी मी टीव्हीला अक्षरश: खिळून होतो. सिराजमध्ये खूप जिद्द आणि उत्कटता दिसली .तो एक अविश्वसनीय प्रयत्न होता.”

पाच कसोटी सामन्यांमध्ये जवळपास 186 षटके गोलंदाजी करूनही शेवटच्या दिवशी त्याच्यात तीच ऊर्जा दिसली, जी त्याची जबरदस्त ताकद आणि मानसिक कणखरता दर्शवते. “तो आता केवळ सपोर्ट गोलंदाज राहिला नाही, तर तो गोलंदाजीचे नेतृत्व करत आहे,” असे अक्रम म्हणाला.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

‘…पण आता खूप उशीर झाला आहे’; भारताचा उल्लेख करत ट्रम्प यांचा मोठा दावा

“आमच्यात घुसून षडयंत्र…”; जरांगे-पाटील यांचा मोठा आरोप, आंदोलकांना केले भावनिक आवाहन

Hyderabad Gazette : हैदराबाद गॅझेटबाबत मसुदा अंतिम टप्प्यात! मंत्री विखे पाटलांची माहिती