Home / लेख / Viral News: दुबईत हरवला भारतीय यूट्यूबरचा फोन, पुढे काय झाले बघा

Viral News: दुबईत हरवला भारतीय यूट्यूबरचा फोन, पुढे काय झाले बघा

Viral News: दुबई हे नागरिकांसाठी सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक मानले जाते. या शहरात क्वचितच गुन्हेगारी, चोरीच्या घटना घडल्याचे पाहायला मिळते....

By: Team Navakal
Viral News

Viral News: दुबई हे नागरिकांसाठी सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक मानले जाते. या शहरात क्वचितच गुन्हेगारी, चोरीच्या घटना घडल्याचे पाहायला मिळते. याचेच उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले.

दुबई विमानतळावर (Dubai Airport) हरवलेला मोबाईल फोन एका प्रसिद्ध तामिळ यूट्यूबरला चेन्नईमध्ये परत मिळाला आहे. दुबई पोलीस (Dubai Police) आणि एमिरेट्स (Emirates) एअरलाइन्सने केलेल्या मदतीबद्दल यूट्यूबर मदन गौरी यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करून त्यांचे आभार मानले आहेत.

गौरी यांनी सांगितले की, त्यांचा फोन आठवडाभरापूर्वी हरवला होता. त्यांनी तात्काळ एमिरेट्सच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना ईमेलद्वारे फोनचे तपशील दिले. जेव्हा ते चेन्नईला परतले, तेव्हा त्यांना एक ईमेल आला, ज्यात त्यांचा फोन सापडल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर दुबई पोलिसांनी तो फोन पुढच्या उपलब्ध फ्लाइटने विनाशुल्क चेन्नईला पाठवण्याची व्यवस्था केली.

दुबईच्या सुरक्षा व्यवस्थेची पुन्हा चर्चा

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकांनी दुबईच्या सुरक्षिततेचे कौतुक केले आहे. ‘जगातील सर्वात सुरक्षित देश’ अशी प्रतिक्रिया एका यूजरने दिली. आणखी एका यूजरने आपला लॅपटॉप दुबईत हरवला होता आणि तो परत मिळाल्याचे सांगितले.

गेल्या वर्षीही लेयला अफशोनकर या एका इन्फ्लुएन्सरने दुबईतील सुरक्षितता तपासण्यासाठी एक प्रयोग केला होता. त्यांनी आपली सोन्याची ज्वेलरी एका पार्क केलेल्या कारच्या बोनेटवर ठेवली. त्यांना हे पाहून आश्चर्य वाटले की, एकही व्यक्ती त्याकडे आकर्षित झाला नाही.

उलट एका महिलेने खाली पडलेला सोन्याचा तुकडा उचलून परत गाडीवर ठेवला होता. ‘अर्धा तास झाला, पण कोणीही सोन्याला हात लावला नाही. यामुळे दुबई जगातील सर्वात सुरक्षित देश नाही, असे कोण म्हणेल?’ असे लेयला अफशोनकर यांनी म्हटले होते. हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा – कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे? जाणून घ्या प्रोसेस

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या
To use reCAPTCHA V3, you need to add the API Key and complete the setup process in Dashboard > Elementor > Settings > Integrations > reCAPTCHA V3.