ITR Filing: आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत आता जवळ आली आहे. नॉन-ऑडिट ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर आहे.
त्यामुळे, जर तुम्ही अजूनही आयकर रिटर्न भरला नसेल, तर लगेच ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे, अन्यथा तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो.
आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार, 7 सप्टेंबर 2025 पर्यंत असेसमेंट इयर 2025-26 साठी सुमारे 4.9 कोटी ITR दाखल करण्यात आले आहेत. यापैकी 4.6 कोटी ITR व्हेरिफाय झाले आहेत आणि 3.3 कोटींपेक्षा जास्त प्रोसेसही झाले आहेत.
ITR भरणे का महत्त्वाचे आहे?
अनेकांना वाटते की जर उत्पन्न कर-मुक्त मर्यादेपेक्षा कमी असेल किंवा त्यांनी आधीच कर भरला असेल, तर ITR दाखल करणे आवश्यक नाही. पण, हे चुकीचे आहे. ITR दाखल करणे अनेक आर्थिक कामांसाठी अनिवार्य आहे. तुम्ही कर आणि व्याज भरले असले तरी, सरकार तुमची कर प्रक्रिया तेव्हाच पूर्ण मानतो, जेव्हा तुम्ही तुमची संपूर्ण उत्पन्न आणि कराची माहिती दाखल करून ती व्हेरिफाय करता.
ITR तुमच्या उत्पन्नाचा एक महत्त्वाचा पुरावा असतो, ज्यामुळे कर्ज आणि क्रेडिट कार्ड मिळवणे सोपे होते. तसेच, ITR द्वारे तुम्ही परतावा (रिफंड) क्लेम करू शकता आणि भविष्यातील नोटिसांपासूनही तुमचा बचाव होतो.
वेळेत ITR न भरल्यास काय होईल?
जर तुम्ही वेळेत ITR दाखल केला नाही, तर तुम्ही नंतर ‘बिलेटेड रिटर्न’ दाखल करू शकता. पण, त्यासाठी तुम्हाला विलंब शुल्क भरावे लागेल.
- जर तुमचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला 5,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल.
- जर तुमचे उत्पन्न 5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर दंड 1,000 रुपयांपर्यंत मर्यादित राहील.
- या व्यतिरिक्त, कर न भरल्यास व्याज, दंड आणि कायदेशीर कारवाईही होऊ शकते, ज्यात 3 महिने ते 7 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
लवकर ITR दाखल केल्याने तुम्हाला परतावा लवकर मिळतो आणि अतिरिक्त व्याज भरावे लागत नाही. त्यामुळे लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी.
हे देखील वाचा –
Asia Cup 2025 स्पर्धेचे बिगुल वाजले! कधी व कुठे पाहाल भारताचे सामने? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक