India vs UAE Asia Cup 2025 : Asia Cup 2025 च्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने हाँगकाँगचा 94 धावांना पराभव केला आहे. या स्पर्धेतील दुसरा सामना भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आज (10 सप्टेंबर) खेळला आहे.
भारतीय संघ फेब्रुवारी महिन्यानंतर प्रथमच T20I सामना खेळत आहे. जागतिक T20I क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला भारतीय संघ हे टूर्नामेंट जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जातो.
संघात श्रेयस अय्यर आणि यशस्वी जैस्वाल सारख्या खेळाडूंना निवडले नसले तरी, भारतीय संघाकडे एक मजबूत आणि अष्टपैलू खेळाडूंची टीम आहे. मात्र, दुबईतील मैदानावर नाणेफेक निर्णायक ठरू शकते.
दुसरीकडे, UAE ने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत मोठी क्षमता दाखवली आहे. दोन्ही सामन्यांमध्ये त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज दिली होती. UAE चा 171 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानकडून केवळ 4 धावांनी पराभव झाला होता.
🗣️ We've had good preparations and time together as a team#TeamIndia captain Suryakumar Yadav talks about the importance of preparations ahead of #AsiaCup2025 @surya_14kumar pic.twitter.com/OsU5HWcLKI
— BCCI (@BCCI) September 9, 2025
Asia Cup 2025 : भारत आणि UAE चे संघ
Team India: सूर्यकुमार यादव (C), शुभमन गिल (VC), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (WK), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (WK), हर्षित राणा, रिंकू सिंग.
राखीव खेळाडू: यशस्वी जैस्वाल, प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग आणि ध्रुव जुरेल.
UAE संघ: मुहम्मद वसीम (कर्णधार), अलीशान शराफू, आर्यन शर्मा (wk), आसिफ खान, ध्रुव पराशर, एथन डिसूझा, हैदर अली, हर्षित कौशिक, जुनैद सिद्दीकी, मतिउल्लाह खान, मुहम्मद फारूक, मुहम्मद जवादुल्लाह, मुहम्मद जोहैब, राहुल चोप्रा (wk), रोहिद खान, सिमरनजीत सिंग आणि सगीर खान.
India vs UAE Asia Cup 2025 : सामना कधी आणि कुठे पाहता येईल?
भारत आणि UAE यांच्यातील सामन्यासाठी नाणेफेक भारतीय वेळेनुसार रात्री 7:30 वाजता होईल, तर सामना रात्री 8:00 वाजता सुरू होईल.
भारतातील चाहते Sony Sports Network वर हा सामना थेट पाहू शकतात. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग SonyLiv App आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.
हे देखील वाचा –
अखेर iPhone 17 सिरीज लाँच! किती आहे भारतातील किंमत, काय आहे खास? जाणून घ्या सर्व माहिती