Home / News / Abhishek Bachchan : ऐश्वर्यानंतर अभिषेक बच्चनही कोर्टात नाव व फोटो वापरावर बंदीची मागणी

Abhishek Bachchan : ऐश्वर्यानंतर अभिषेक बच्चनही कोर्टात नाव व फोटो वापरावर बंदीची मागणी

After Aishwarya Abhishek Moves Court Over Image Misuse Abhishek Moves Court Over Image Misuse – बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन(Aishwarya...

By: Team Navakal
Abhishek Moves Court Over Image Misuse

After Aishwarya Abhishek Moves Court Over Image Misuse

Abhishek Moves Court Over Image Misuse – बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन(Aishwarya Rai Bachchan) यांच्यानंतर त्यांचे पती, अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan)यांनीही आपली प्रतिष्ठा आणि खासगीपणा जपण्यासाठी विनापरवाना नाव, फोटो, आवाज वापरावर बंदी घालण्याची मागणी करत दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court)धाव घेतली आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) साहाय्याने तयार होणारे खोट्या व्हिडिओ, छायाचित्रे आणि अगदी अश्लील सामग्रीचा गैरवापर करून आपल्या प्रतिमेला धक्का पोहोचवला जात असल्याचे अभिषेक यांनी याचिकेत म्हटले आहे. अशा वेबसाईट्स आणि प्लॅटफॉर्म्सवर तातडीने बंदी आणावी, अशी मागणीही त्यांनी केली. याचिकेवर न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या पीठासमोर सुनावणी झाली.

अभिषेक यांच्यावतीने वरिष्ठ वकील प्रवीण आनंद, अमित नाईक, मधु गडोडिया आणि ध्रुव आनंद यांनी बाजू मांडली. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, काही वेबसाईट्स अभिषेक यांची छायाचित्रे व व्हिडिओंचा विपर्यास करत आहेत, त्यावर बनावट स्वाक्षऱ्या लावत आहेत आणि आक्षेपार्ह तसेच अश्लील साहित्य तयार करत आहेत. या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या प्रतिष्ठेला गंभीर धक्का पोहोचत आहे.

याआधी ऐश्वर्या राय बच्चन यांनीही अशाच प्रकारची याचिका दाखल केली होती. त्यांच्या छायाचित्रांचा विविध वस्तूंवर विनापरवानगी वापर करून त्यांची विक्री केली जात असल्याची तक्रार केली होती. त्यावेळी न्यायालयाने बच्चन यांच्या खासगीपणाच्या अधिकाराचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यासाठी अंतरिम आदेश जारी करण्याचा इशारा दिला होता.


हे देखील वाचा –

सत्तेसाठी रावण अहंकार दहन करा ! गणेश नाईकांचे वक्तव्य

संतोष देशमुख प्रकरणी आरोपींच्या दोषमुक्ती अर्जावर युक्तिवाद पूर्ण

जीएसटी कपातीमुळे Jeep च्या गाड्या स्वस्त; खरेदीवर लाखो रुपयांची बचत, जाणून घ्या नवीन किंमती

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या