Home / देश-विदेश / Punjab Flood : पंजाबमधील दोन हजार गावे अजूनही पुराच्या विळख्यात

Punjab Flood : पंजाबमधील दोन हजार गावे अजूनही पुराच्या विळख्यात

Punjab Flood – पंजाबमधील सर्वच २३ जिल्ह्यांना (23 districts) पुराचा फटका बसला आहे. आता पावसाचा जोर ओसरला असला तरी राज्यातील...

By: Team Navakal
Punjab Flood

Punjab Flood – पंजाबमधील सर्वच २३ जिल्ह्यांना (23 districts) पुराचा फटका बसला आहे. आता पावसाचा जोर ओसरला असला तरी राज्यातील दोन हजारहून अधिक गावे अजूनही पुराच्या विळख्यात आहेत. शेकडो एकर शेती पाण्याखाली आहे. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांनी पंजाबला १६०० कोटी आणि हिमाचल प्रदेशला (Himachal Pradesh) १५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली. पंजाब आणि हिमाचलमधील पूरस्थितीची हवाई पाहणी केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली होती.

हिमाचलमध्ये पूरस्थिती आणि अतिपावसामुळे आतापर्यंत ४१५६ कोटी रुपयांच्या सरकारी आणि खासगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. भुस्खलनाच्या १३७ घटना घडल्या. ९७ ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे १२३७ घरे जमीनदोस्त झाली. यंदा पावसाने हरयाणालाही झोडपून काढले. तिथे ९ सप्टेंबरपर्यंत सरासरीहून ४६ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. राज्यात सरासरी ३८५.१ मिमी पावसाची नोंद होते. पण आताच ५६३.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जम्मू काश्मीरलाही (Jammu & Kashmir) पावसाने झोडपले . राज्याची जीवनवाहिनी असलेला जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग आज १६ दिवसानंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. रस्त्यावर अनेक ठिकाणी सातत्याने भुस्खलन होत असल्यामुळे हा महामार्ग बंद करण्यात आला होता. वाहतूक पूर्ववत झाल्याने काश्मीर खोऱ्यातून फळे आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पुन्हा सुरू होणार आहे.

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सर्व प्रमुख नद्यांना पूर आला आहे. कानपुरात गंगेची पाणीपातळी वाढल्याने रहिवाशी वस्त्या जलमय झाल्या आहेत. गंगा आणि यमुनेच्या संगमावरील प्रयागराजमध्ये पाणीपातळी वाढली आहे. अनेक घाट पाण्याखाली गेले आहेत. यमुनेच्या काठावरील आग्रा येथील हाथी घाटापर्यंत पाणी पोहोचले आहे.


हे देखील वाचा

राजस्थान रॉयल्सच्या सीईओंचाही राजीनामा

संतोष देशमुख प्रकरणी आरोपींच्या दोषमुक्ती अर्जावर युक्तिवाद पूर्ण

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा

Web Title:
संबंधित बातम्या