Relief for Shah Rukh Khan and Deepika Padukone in Hyundai Car Case; Court Stays Investigation
Relief for Shah Rukh & Deepika – बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांना राजस्थान उच्च न्यायालयात मोठा दिलासा मिळाला. ह्युंदाई दोषपूर्ण गाड्यांच्या (Hyundai Car Case) जाहिराती व प्रमोशनप्रकरणी दोघांविरोधत भरतपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यांच्या चौकशीस न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
केवळ शाहरुख आणि दीपिकाच नव्हे, तर ह्युंदाई कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अन्सो किम, सीओओ तरुण गर्ग आणि स्थानिक शोरूम मालकांनाही अंतरिम दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती सुदेश बन्सल यांच्या एकलपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने स्थगिती आदेश देताना म्हटले, की एफआयआरमध्ये शाहरुख–दीपिका यांच्यावर थेट गैरकृत्याचे आरोप नाहीत. ते फक्त ब्रँड अॅम्बेसेडर या भूमिकेत असल्याने त्यांना या प्रकरणात गुंतविणे योग्य नाही. कारशी संबंधित समस्या असल्यास फिर्यादीने ग्राहक न्यायालयाचा मार्ग अवलंबायला हवा, असे स्पष्ट करण्यात आले.
या खटल्यात शाहरुख यांच्या वतीने वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी, तर दीपिका आणि कंपनी अधिकाऱ्यांच्या वतीने वरिष्ठ वकील विवेकराज बाजवा यांनी युक्तिवाद केला. ही याचिका वकील आदित्य शर्मा दौसावाला यांच्या मार्फत दाखल करण्यात आली होती.
भरतपूर येथील किर्ती सिंह यांनी २०२२ मध्ये ह्युंदाई कंपनीची अल्काझार ही कार खरेदी केली होती. कारमध्ये सतत तांत्रिक अडचणी येत असून, तक्रार न सुटल्याने त्यांनी गेल्या महिन्यात कंपनीच्या अधिकाऱ्यांसह शाहरुख व दीपिका यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली होती.
हे देखील वाचा –
‘लाडकी बहीण’ योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती
चार्ली कर्क यांची अमेरिकेत हत्या, पण धक्का ट्रम्प यांना; असं का?