Home / देश-विदेश / आता गाड्यांच्या शोरूममध्येही ‘मोदी’; सरकारने कार कंपन्यांना दिले ‘हे’ आदेश?

आता गाड्यांच्या शोरूममध्येही ‘मोदी’; सरकारने कार कंपन्यांना दिले ‘हे’ आदेश?

PM Modi Photo in Auto Showrooms : केंद्र सरकारने जीएसटी स्लॅब्समध्ये बदल केल्याने वस्तूंच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. याची...

By: Team Navakal
PM Modi Photo in Auto Showrooms

PM Modi Photo in Auto Showrooms : केंद्र सरकारने जीएसटी स्लॅब्समध्ये बदल केल्याने वस्तूंच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. याची सुरुवात वाहनांपासून झाली आहे. अनेक वाहन कंपन्यांनी गाड्यांच्या किंमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे.

मात्र,, आता अवजड उद्योग मंत्रालयाने (MHI) सर्व वाहन उत्पादक कंपन्यांना एक अनोखा आदेश दिला आहे. यानुसार, देशभरातील सर्व डीलर्सना त्यांच्या शोरूममध्ये असे पोस्टर लावावे लागणार आहेत, ज्यात जीएसटी कपातीमुळे गाडीच्या किमतीत किती फरक पडला आहे, हे दाखवले जाईल. महत्त्वाचे म्हणजे, या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असणे बंधनकारक आहे.

इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सच्या (SIAM) माध्यमातून हा आदेश कंपन्यांपर्यंत पोहोचला आहे. सरकारच्या या निर्णयावर उद्योग क्षेत्रातील काही अधिकाऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

यापूर्वी असा कोणताही आदेश नव्हता. तसेच, या पोस्टरसाठी येणाऱ्या खर्चाची विभागणी कंपन्या आणि डीलर्स मध्ये कशी होणार, यावरही चर्चा सुरू आहे. एका अधिकाऱ्याच्या अंदाजानुसार, या पोस्टरच्या छपाई आणि वितरणासाठी संपूर्ण उद्योग क्षेत्राला 20-30 कोटींपर्यंत खर्च येऊ शकतो. विशेष बाब म्हणजे, लक्झरी कार उत्पादक कंपन्यांना मात्र या आदेशातून सूट देण्यात आली आहे.

लहान आणि मोठ्या गाड्यांसाठी करात मोठी सूट

गेल्या आठवड्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत अनेक वाहनांवरील करात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

  • लहान गाड्यांसाठी: ज्या गाड्यांची लांबी 4 मीटरपेक्षा कमी आहे आणि पेट्रोल इंजिन 1200cc पर्यंत तर डिझेल इंजिन 1500cc पर्यंत आहे, त्यांच्यावरील कर 29-31% वरून थेट 18% करण्यात आला आहे.
  • मोठ्या गाड्यांसाठी: ज्यांची लांबी 4 मीटरपेक्षा जास्त आहे आणि इंजिन 1500cc पेक्षा मोठे आहे, त्यांच्यासाठी कराचा दर 50% वरून 40% करण्यात आला आहे.

मारुती सुझुकी, ह्युंदाई, महिंद्रा, टाटा मोटर्स, टोयोटा आणि किआ यांसारख्या प्रमुख कंपन्यांनी जीएसटी कपातीचा पूर्ण लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे अनेक मॉडेल्सच्या किमती कमी झाल्या आहेत.


हे देखील वाचा –

‘लाडकी बहीण’ योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या