Home / महाराष्ट्र / Pune Latur Special Train: मराठवाड्यातील लोकांसाठी खुशखबर; पुणे-लातूर विशेष रेल्वेचे वेळापत्रक जाहीर

Pune Latur Special Train: मराठवाड्यातील लोकांसाठी खुशखबर; पुणे-लातूर विशेष रेल्वेचे वेळापत्रक जाहीर

Pune Latur Special Train: सणासुदीच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेऊन आणि मराठवाड्यातील नागरिकांची सोय व्हावी यासाठी सरकारने एक विशेष रेल्वे...

By: Team Navakal
Pune Latur Special Train

Pune Latur Special Train: सणासुदीच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेऊन आणि मराठवाड्यातील नागरिकांची सोय व्हावी यासाठी सरकारने एक विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

ही रेल्वे पुणे (हडपसर) आणि लातूर (Pune Latur Special Train) दरम्यान धावणार असून, 26 सप्टेंबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीत दिवाळीच्या प्रवासासाठी प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

विशेष रेल्वेचे वेळापत्रक

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, या विशेष सेवेमुळे सणांच्या दिवसांत प्रवाशांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होईल. कुटुंबातील सदस्य, नोकरदार आणि विद्यार्थ्यांना याचा विशेष फायदा होणार आहे.

रेल्वे क्रमांक 01429 (लातूर ते हडपसर):

  • सुटण्याची वेळ: सकाळी 9 वाजून 30 मिनिटे
  • थांबे: हरंगुल, धर्मपुरी, उस्मानाबाद, कुर्डुवाडी, जेऊर, दौंड
  • पोहोचण्याची वेळ: दुपारी तीन वाजून तीस मिनिटे
  • धावण्याचे दिवस: सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार

रेल्वे क्रमांक 01430 (हडपसर ते लातूर):

  • सुटण्याची वेळ: दुपारी 4 वाजून 5 मिनिटे
  • थांबे: दौंड, जेऊर, कुर्डुवाडी, उस्मानाबाद, धर्मपुरी, हरंगुल
  • पोहोचण्याची वेळ: रात्री 9 वाजून 20
  • मिनिटे
  • धावण्याचे दिवस: सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार

हे देखील वाचा – चार्ली कर्क हत्या: एफबीआयकडून शूटरचा फोटो जारी; संशयिताचा शोध सुरू

Web Title:
संबंधित बातम्या