Home / मनोरंजन / ‘बॉम्बे’ऐवजी ‘मुंबई’ म्हणा, अन्यथा…’; कपिल शर्माला मनसेचा कडक इशारा

‘बॉम्बे’ऐवजी ‘मुंबई’ म्हणा, अन्यथा…’; कपिल शर्माला मनसेचा कडक इशारा

MNS Warns Kapil Sharma: महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहराचे नाव बदलून 30 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे, तरीही अनेक हिंदी...

By: Team Navakal
MNS Warns Kapil Sharma

MNS Warns Kapil Sharma:  महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहराचे नाव बदलून 30 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे, तरीही अनेक हिंदी चित्रपट आणि शोमध्ये अजूनही ‘बॉम्बे’ असा उल्लेख केला जातो. आता याच मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) लोकप्रिय कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ला धारेवर धरले आहे.

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, धमकी वजा इशाराच दिला आहे. तसेच, शहराचा उल्लेख ‘बॉम्बे’ न करता मुंबई असाच करण्यास सांगितले आहे.

नेमका आक्षेप काय?

मनसेने ‘द कपिल शर्मा शो’च्या टीमला थेट पत्र पाठवून इशारा दिला आहे. अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, 1995 मध्ये महाराष्ट्र सरकारने आणि त्यानंतर 1996 मध्ये केंद्र सरकारने ‘बॉम्बे’ ऐवजी ‘मुंबई’ या नावाला अधिकृत मान्यता दिली आहे. तरीही, या शोमध्ये अनेकदा ‘बॉम्बे’ हा शब्द वापरला जातो, जे आम्हाला मान्य नाही.

त्यांनी हुमा कुरेशी, साकिब सलीम आणि इतर कलाकारांच्या एका जुन्या भागाची क्लिप शेअर केली आहे, ज्यात हुमा कुरेशी ‘बॉम्बे’ असा उल्लेख करताना दिसत आहे.

मनसेचा कडक इशारा

एका वृत्तवाहिनीशी बोलताना अमेय खोपकर यांनी यावर अधिक स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “कपिल शर्मा गेली 15 वर्षांपासून मुंबईत राहतो, तरीही त्याला शहराचे नाव नीट घेता येत नाही का? बाहेरून येणाऱ्या लोकांना इथे काम मिळते, पण ते शहराच्या नावाचा आदर करत नाहीत, याची त्यांना लाज वाटायला पाहिजे. उद्या आम्ही कपिलला ‘टपिल’ म्हटले तर ते चालेल का?”

खोपकरांनी पुढे इशारा दिला आहे की, जर ‘द कपिल शर्मा शो’ आणि बॉलिवूडमधील इतर शोनी मुंबईचा उल्लेख ‘मुंबई’ असा केला नाही, तर मनसे शूटिंगच्या ठिकाणी जाऊन आंदोलन करेल आणि शूटिंग बंद पाडेल.

या मुद्द्यामुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटले असून, आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याकडे लक्ष वेधले जात आहे.


हे देखील वाचा – 

Pune Latur Special Train: मराठवाड्यातील लोकांसाठी खुशखबर; पुणे-लातूर विशेष रेल्वेचे वेळापत्रक जाहीर

चार्ली कर्क हत्या: एफबीआयकडून शूटरचा फोटो जारी; संशयिताचा शोध सुरू

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या