Gangster Vijay Palande : खुनाचे तीन गुन्हे (Three murder cases) दाखल असलेला गँगस्टर विजय पालांडेने आपल्याविरूद्धच्या तीन खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम (Adv. Ujjwal Nikam)यांची नियुक्ती कायम ठेवण्यास विरोध केला आहे. पालांडे याने सत्र न्यायालयात याचिका दाखल केली असून राज्यसभेचे सदस्यत्व (Member of the Rajya Sabha) मिळाल्यानंतर निकम हे सरकारी वकीलाचे लाभाचे पद कसे काय कायम राखू शकतात,असा सवाल उपस्थित केला आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections)अॅड . निकम यांना भाजपाने मुंबईत उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर भाजपाने त्यांची राज्यसभेवर वर्णी लावली आहे याकडे पालांडे याने न्यायालयाचे लक्ष वेधले आहे.राज्यसभेचे खासदार बनल्यानंतरही निकम यांनी आपल्याविरुध्दच्या खटल्यात सरकारी वकील पदाचा राजीनामा दिलेला नाही. संसदेचे सदस्य असताना निकम यांना सरकारी वकील म्हणून कायम ठेवणे घटनेच्या तत्वाचे उल्लंघन करणे आहे. निकम सरकारी वकील राहिल्यास खटल्याचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता आहे. हे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाच्याही विरोधी आहे,असा युक्तीवाद याचिकेद्वारे पालांडेच्या वकिलांनी केला आहे.
पालांडेच्या वकिलांच्या या युक्तीवादावर बाजू मांडण्यासाठी सरकार पक्षाने न्यायालयाकडे मुदत देण्याची विनंती केली. ती न्यायालयाने मान्य केली असून यासंबंधी पुढील सुनावणी २६ सप्टेंबर रोजी होणार आहे.
दिल्लीतील व्यावसायिक अरूण टिक्कू आणि चित्रपट निर्माता करणकुमार कक्कर यांच्या हत्येप्रकरणी गँगस्टर पालांडे याला एप्रिल २०१२ मध्ये अटक करण्यात आली. त्यापूर्वी दुसऱ्या एका दुहेरी खून प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तर तिसरा खटला हा अज्ञात व्यक्तीच्या हत्येसंबंधी आहे.त्यापैकी टिक्कू आणि कक्कर यांच्या हत्ये प्रकरणी राज्य सरकारने अॅड उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. मात्र त्यावेळी ते राज्यसभेचे सदस्य नव्हते.२०२४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर त्यांची राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली आहे.
हे देखील वाचा –
‘बॉम्बे’ऐवजी ‘मुंबई’ म्हणा, अन्यथा…’; कपिल शर्माला मनसेचा कडक इशारा
लोढा डेव्हलपर्ससोबत महाराष्ट्र सरकारचा सामंजस्य करा; राज्यात उभारणार ग्रीन डेटा सेंटर पार्क’
IND vs PAK सामन्याला चाहत्यांचा थंड प्रतिसाद! तिकिटांची विक्रीच झाली नाही; कारण काय?