IAS Officer Success Story: सरकारी नोकरीचे स्वप्न लाखो तरूण बघतात. त्यातही आयएएस, आयपीएस अधिकारी होण्याची प्रत्येकाची इच्छा असतात. ‘स्वप्नं तीच पूर्ण होतात ज्यांच्यासाठी हार मानण्याचा विचार मनात येत नाही’ ही म्हण तमिळनाडूच्या आयएएस अधिकारी सी. वनमती यांच्या बाबतीत अगदी खरी ठरते. या लेखातून त्यांनी अडचणींवर मात करत हे यश कसे मिळवले, याविषयी जाणून घेऊयात.
एका सामान्य कुटुंबातून आलेल्या वनमती यांनी लहानपणीची गरिबी, आर्थिक अडचणी आणि सामाजिक दबाव यावर मात करत UPSC परीक्षेत यश मिळवले आणि लाखो तरुणांसाठी त्या प्रेरणा बनल्या आहेत. आज त्या महाराष्ट्र कॅडरमध्ये राज्य कर विभागाच्या सहआयुक्त म्हणून कार्यरत आहेत.
IAS Officer Success Story: लहानपणापासूनच सुरू झाला संघर्ष
एका मुलाखतीनुसार, सी. वनमती यांचे बालपण खूपच साधे होते. त्यांचे वडील टॅक्सी चालक होते आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. लहानपणी वनमती म्हशी राखण्याचे आणि घरातील कामांमध्ये मदत करण्याचे काम करत असत. मात्र, या कठीण परिस्थितीचा सामना करतानाही त्यांच्या आई-वडिलांनी शिक्षणाला नेहमीच प्राधान्य दिले.
अभ्यासातून मिळाली प्रेरणा
लग्नासाठी घरून आलेल्या दबावानंतरही वनमती यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले आणि पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यांना आयएएस अधिकारी बनण्याची प्रेरणा एका महिला जिल्हाधिकाऱ्याला पाहून आणि ‘गंगा यमुना सरस्वती’ या टीव्ही मालिकेतून मिळाली.
त्याच क्षणी त्यांनी निश्चय केला की एक दिवस त्याही देशाची सेवा करण्यासाठी अधिकारी बनतील.
3 वेळा अपयश, पण हार मानली नाही
UPSC परीक्षेचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. त्यांना पहिल्या 3 प्रयत्नांमध्ये अपयश आले, पण त्यांनी हिंमत सोडली नाही. अखेरीस, 2015 मध्ये चौथ्या प्रयत्नात त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत 152 वा क्रमांक मिळवला आणि त्या IAS अधिकारी बनल्या.
आज त्यांची ही प्रेरणादायी कथा हे सिद्ध करते की, जर तुमच्याकडे जिद्द आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल, तर कोणतेही स्वप्न अपूर्ण राहत नाही.
हे देखील वाचा – सणासुदीच्या तोंडावर Hero ची मोठी घोषणा, Splendor ची किंमत केली खूपच कमी; पाहा डिटेल्स