Motorola G35 5G : स्मार्टफोन खरेदी करायचा आहे, पण बजेट कमी आहे? चिंता करू नका, कारण तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. Motorola ने नुकताच लाँच केलेला त्यांचा G35 5G हा स्मार्टफोन आता Flipkart वर तब्बल 9,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे.
Motorola G35 5G वर धमाकेदार ऑफर
Flipkart वर Motorola G35 5G स्मार्टफोन 8,999 रुपयांच्या सवलतीच्या किमतीत लिस्ट करण्यात आला आहे. निवडक बँक कार्ड्स वापरून पेमेंट केल्यास तुम्हाला 5% पर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.
जुना फोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला 7,850 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते, पण त्याची अंतिम किंमत तुमच्या जुन्या फोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असेल.
हा फोन Guava Red, Leaf Green आणि Midnight Black अशा तीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.
Motorola G35 5G : फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Motorola G35 5G मध्ये खालील प्रमुख वैशिष्ट्ये आहेत:
- डिस्प्ले: 6.72 इंचाचा फुल HD+ 120Hz डिस्प्ले.
- प्रोसेसर: T760 प्रोसेसरने सुसज्ज असलेला हा फोन 5G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो.
- कॅमेरा: मागील बाजूस 50MP चा मुख्य सेन्सर आणि 8MP चा सेकंडरी सेन्सर असलेला ड्युअल कॅमेरा सेटअप. सेल्फीसाठी समोर 16MP चा कॅमेरा.
- बॅटरी: फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh ची दमदार बॅटरी.
हे देखील वाचा – Aaditya Thackeray : ‘BCCI पैशांसाठी खेळत आहे का?’; भारत-पाक सामन्यावरून आदित्य ठाकरेंची जोरदार टीका