MP Sanjay Raut – मराठा (Maratha)आणि ओबीसी (OBC)आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य मंत्रिमंडळात टोकाचे मतभेद असल्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis)यांना टोला लगावला. राज्यातील कोणत्याही प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी फडणवीस सक्षम (capable) मुख्यमंत्री आहेत, अशी उपरोधिक टीका राऊत यांनी केली.
राज्याचे सर्व प्रश्न, सरकारमधील, कॅबिनेटमधील सर्व समस्या सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे सक्षम मुख्यमंत्री आहेत. केंद्रात नरेंद्र (Narendra)आणि राज्यात देवेंद्र असल्याने कुठेही कोणत्याही समस्या आता शिल्लक राहिलेल्या नाहीत ,असे राऊत म्हणाले.
मराठा आरक्षणाबद्दल सरकारने नुकत्याच काढलेल्या जीआरवर छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) प्रचंड नाराज आहेत. या मुद्यावरून राज्यात अराजक माजेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. उद्या या मुद्यावरून मंत्रिमंडळात खून जरी पडले तरी मला आश्चर्य वाटणार नाही, असे राऊत पुढे म्हणाले.
एकूणच आरक्षणाबाबत सुरू असलेल्या गदारोळामुळे सर्वसामान्यांच्या मनात जो संशय निर्माण झाला आहे तो दूर करण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला पाहिजे. त्यांनी या विषयावर सर्वांना एकत्र आणून पत्रकार परिषद घ्यावी.आरक्षणावर सरकारची नेमकी भूमिका काय आहे हे एकदा सर्वांसमोर मांडावे,असा सल्लाही राऊत यांनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या मणिपूर (Manipur)दौऱ्यावरही राऊत यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, जेव्हा मणिपूर हिंसाचारामध्ये धगधगत होते,तरुणांची रस्त्यावर धिंड काढली जात होती, महिलांवर दिवसाढवळ्या अत्याचार केले जात होते तेव्हा मोदींनी मणिपूरकडे ढुंकनही पाहिले नाही.आता तीन वर्षांनंतर त्यांचा मणिपूर दौरा म्हणजे एक ढोंग आहे.
हे देखील वाचा –
मोदींच्या मातोश्रींवरील व्हिडिओ; भाजपाचे काँग्रेसविरोधात आंदोलन
आता थेट रोबोट चालवणार सरकार? ‘या’ देशाने सरकारी कामांसाठी नेमला ‘AI मंत्री’
नारी शक्तीचा गौरव! भारतीय महिला अधिकारी ‘समुद्र प्रदक्षिणा’ मोहिमेवर; करणार 26,000 नॉटिकल मैल प्रवास