Home / महाराष्ट्र / HC Slams BMC: खड्डयांमुळे मृत्यू झाल्यास नुकसानभरपाई द्यावी लागेल; हायकोर्टाचा पालिकांना इशारा

HC Slams BMC: खड्डयांमुळे मृत्यू झाल्यास नुकसानभरपाई द्यावी लागेल; हायकोर्टाचा पालिकांना इशारा

HC Slams BMC: मुंबईसह राज्यभरातील रस्त्यांवरील धोकादायक खड्डयांवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यात अपयशी ठरल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मुंबई...

By: Team Navakal
HC Slams BMC

HC Slams BMC: मुंबईसह राज्यभरातील रस्त्यांवरील धोकादायक खड्डयांवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यात अपयशी ठरल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मुंबई मनपासह (BMC) सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना कडक शब्दात सुनावले.खड्डयांमुळे होणाऱ्या अपघातांत मृत्यूमुखी पडणाऱ्या किंवा जखमी होणाऱ्यांना नुकसानभरपाई द्यावीच लागेल,असे न्यायालयाने स्पष्ट केले.

मुंबई शहर आणि मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात न्या.रेवती मोहिते-डेरे आणि न्या. संदेश पाटील यांच्या उत्तमखंडपीठासमोर नुकतीच सुनावणी झाली.त्याप्रसंगी न्यायालयाने प्रशासनाला जाब विचारला. पूर्वी रस्ते वर्षानुवर्षे टिकत होते. पण हल्ली एका पावसात रस्ते खड्डेमय होऊन वाहतुकीसाठी धोकादायक बनतात,असे का होते,असा सवाल न्यायालयाने विचारला.

सुनावणीदरम्यान २०१८ मध्ये न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न झाल्याबद्दल दाखल अवमान याचिकेवर अॅड.राजू ठक्कर यांनी खड्डयांमुळे पाच जणांचा बळी गेला,अशी माहिती न्यायालयाला दिली.
त्याची गंभीर दखल घेत कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बळी जातो तेव्हा संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते.अशा परिस्थितीत संबंधित प्रशासनाने नुकसान भरपाई द्यायलाच हवी,असे न्यायालयाने सांगितले.

हे देखील वाचा –

एकनाथ शिंदे-फडणवीसांमध्ये अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांंवरून वाद

वक्फ सुधारणा स्थगिती याचिकासोमवारी सुप्रीम कोर्टात निकाल

मुंबई बॉम्ब स्फोटात निर्दोष आरोपीला ९ कोटींची नुकसानभरपाई हवी; विनाकारण ९ वर्षे तुरुंगवास

Web Title:
संबंधित बातम्या