Top 5 Web Series: OTT प्लॅटफॉर्मवर सध्या अनेक वेब सिरीज आणि शो प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. पण काही ठराविक सिरीजनी प्रेक्षकांवर खास छाप पाडली आहे.
तुम्ही जर ओटीटीवर नक्की काय पाहावे, हे शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी अशाच सर्वाधिक पाहिलेल्या शो ची लिस्ट घेऊन आलो आहोत.
Top 5 Web Series: या आठवड्यात सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या वेब सिरीजची यादी
राइज अँड फॉल (Rise and Fall)
अश्नीर ग्रोवर यांचा हा नवा शो अमेझॉन MX प्लेयरवर नुकताच सुरू झाला आहे. या शोने अल्पावधीतच प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली असून, तो सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या वेब शोजच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या शोला 38 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यात धनश्री वर्मा, अर्जुन बिजलानी, पवन सिंग आणि कीकू शारदा सारखे सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून सहभागी आहेत.
हाफ सीए सीझन 2 (Half CA Season 2)
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर एहसास चन्ना हिचा शो ‘हाफ सीए सीझन 2’ आहे, जो अमेझॉन MX प्लेयरवर स्ट्रीम होत आहे. या शोचा पहिला सीझनदेखील यशस्वी झाला होता. दुसऱ्या सीझनला आतापर्यंत 27 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
वेडनेसडे सीझन 2 (Wednesday Season 2)
तिसऱ्या क्रमांकावर अमेरिकन सुपरनॅचरल मिस्ट्री वेब सिरीज ‘वेडनेसडे सीझन 2’ आहे, जी नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. या शोला आतापर्यंत 24 लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले आहे.
एलियन अर्थ (Alien Earth)
ही एक अमेरिकन सायन्स फिक्शन हॉरर टीव्ही सिरीज आहे, जी ‘एलियन’ फ्रँचायझीमधील पहिली टीव्ही सिरीज आहे. तुम्ही हा शो जिओ हॉटस्टारवर पाहू शकता.
सारे जहाँ से अच्छा (Sare Jahan Se Accha)
या यादीत पाचव्या क्रमांकावर प्रतीक गांधी याची वेब सिरीज आहे. गेल्या आठवड्यात ही सिरीज पहिल्या क्रमांकावर होती. या आठवड्यात तिला 12 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यात सनी हिंदुजा आणि रजत कपूर यांसारखे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
हे देखील वाचा – फवाद खान-वाणी कपूरच्या ‘अबीर गुलाल’ला भारतात ‘ग्रीन सिग्नल’? ‘या’ तारखेला रिलीज होण्याची शक्यता