IND vs PAK Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघामध्ये आज महामुकाबला पाहायला मिळणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला व ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर या सामन्याला जोरदार विरोध होत आहे. असे असतानाही दोन्ही संघ मैदानावर उतरणार आहे.
आशिया कपमधील या आधीच्या सामन्यात भारताने यूएईचा, तर पाकिस्तान ओमनचा पराभव केला आहे. त्यामुळे आता दोन्ही संघातील उद्याचा सामना महत्त्वाचा असणार आहे.
IND vs PAK Asia Cup 2025: कधी आणि कुठे होणार सामना?
Asia Cup 2025 मधील हा ग्रुप A सामना आज (13 सप्टेंबर) भारतीय वेळेनुसार रात्री 8:00 वाजता दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे खेळला जाणार आहे.
IND vs PAK Asia Cup 2025 Live Streaming: लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहाल?
हा मोठा सामना तुम्ही Sony LIV ॲप आणि त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर लाईव्ह पाहू शकता. तसेच, टीव्हीवर Sony Sports 1 आणि Sony Sports 5 वर त्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल.
भारत-पाकिस्तान रेकॉर्ड्स
T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान एकूण 13 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी भारताने 10 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने 3 सामने जिंकले आहेत.
Asia Cup मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण 18 सामने झाले आहेत. यापैकी भारताने 10, तर पाकिस्तानने 6 सामने जिंकले आहेत. 2 सामने अनिर्णित राहिले.
ODI सामन्यांचा विचार करता, भारताने 58 वेळा, तर पाकिस्तानने 73 वेळा विजय मिळवला आहे.
IND vs PAK Asia Cup 2025: दोन्ही संघ
भारत (IND): सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वरुण चक्रवर्ती, संजू सॅमसन (यष्टीरक्षक).
पाकिस्तान (PAK): हॅरिस रौफ, हसन अली, सलमान आगा (कर्णधार), हुसेन तलत, अबरार अहमद, फहीम अश्रफ, फखर जमान, हसन नवाज, मोहम्मद नवाज, खुशदिल शाह, मोहम्मद हॅरिस (यष्टीरक्षक), मोहम्मद वसीम, सलमान मिर्झा, शाहीन शाह आफ्रिदी, साहिबजादा फरहान, सैम अयुब, सुफियान मुकीम.
हे देखील वाचा – Asia Cup 2025: IND vs PAK सामन्याला चाहत्यांचा थंड प्रतिसाद! तिकिटांची विक्रीच झाली नाही; कारण काय?