Home / देश-विदेश / Ice cream word ban : उत्तर कोरियात आईस्क्रीम शब्दावर बंदी! किम जोंगचा अजब फतवा

Ice cream word ban : उत्तर कोरियात आईस्क्रीम शब्दावर बंदी! किम जोंगचा अजब फतवा

Ice cream word ban : उत्तर कोरियाचे (North Korea) हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un)हे पुन्हा एकदा आपल्या विचित्र...

By: Team Navakal
Ice cream word ban

Ice cream word ban : उत्तर कोरियाचे (North Korea) हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un)हे पुन्हा एकदा आपल्या विचित्र आणि कठोर आदेशांमुळे जगभरात चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी देशातील काही सर्वसामान्य इंग्रजी शब्दांवरच बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात आईस्क्रीम (Ice cream), हॅम्बर्गर (Hamburger) आणि कॅराओके (Karaoke) या शब्दांचा समावेश आहे.

सरकारच्या नव्या आदेशानुसार, इंग्रजी शब्दांच्या ऐवजी स्थानिक शब्दावलीचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे आता आईस्क्रीमऐवजी एसेउकिमो किंवा ईओरेम्बोसुंगी असा शब्द वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. हॅम्बर्गर ऐवजी दाजिन-गोगी ग्योप्पांग (ग्राउंड बीफसह डबल ब्रेड) म्हणावे लागेल तर कॅराओके मशीनच्या जागी ऑन-स्क्रीन अकॉम्पनिमेंट मशीन हा शब्द वापरावा लागणार आहे. यासाठी वॉनसन बीच रिसॉर्टसारख्या आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्रांवर काम करणाऱ्या गाईडना विशेष सरकारी प्रशिक्षण दिले जात आहे. त्यात शासकीय घोषणांमध्ये वापरले जाणारे अधिकृत शब्द पाठांतर करणे सक्तीचे करण्यात आले आहे.

उत्तर कोरियामध्ये परदेशी संस्कृतीचा प्रभाव रोखण्यासाठी अशा प्रकारच्या बंदी आधीपासूनच आहेत. याआधी उत्तर कोरियामध्ये परदेशी संस्कृतीवर बंदी घालण्यासाठी अनेक कठोर धोरणे लागू करण्यात आली आहेत. परदेशी चित्रपट किंवा टीव्ही शो पाहणे व शेअर करणे याला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. डिसेंबर २०२१ मध्ये माजी नेते किम जोंग इल यांच्या जयंतीनिमित्त ११ दिवस नागरिकांवर हसणे व सेलिब्रेशन करण्यावर बंदी घालण्यात आली होती.


हे देखील वाचा 

दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला पडतोय ‘काळा’; कारण काय? वाचा

फ्री फायर गेममध्ये १४ लाख गमावल्याने मुलाची आत्महत्या

रिलायन्सला सुप्रीम कोर्टाचा दिलासा ; बीपीसीएल भूखंड खटल्याला स्थगिती

Web Title:
संबंधित बातम्या