ChatGPT usage study: माहिती शोधण्यासाठी अजूनही गुगलचाच वापर केला जातो, असा आपला समज असेल तर आता त्यात बदल करण्याची वेळ आली आहे. गुगलच्या वर्चस्वाला मोठा धक्का देणारी एक नवीन माहिती समोर आली आहे.
ओपनएआयने (OpenAI) केलेल्या एका रिसर्चमध्ये असे म्हटले आहे की, आता मोठ्या संख्येने युझर्स माहिती शोधण्यासाठी ChatGPT कडे वळत आहेत. या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) स्टार्टअप कंपनीने सांगितले की, जुलै 2025 पर्यंत ChatGPT वर होणाऱ्या एकूण संवादांपैकी 24% संवाद फक्त माहिती शोधण्याशी संबंधित होते, जो गेल्या वर्षाच्या तुलनेत 10% जास्त आहे.
अहवालातील मुख्य निष्कर्ष
हा अहवाल ओपनएआयच्या इकॉनॉमिक रिसर्च टीम आणि हार्वर्डचे अर्थशास्त्रज्ञ डेव्हिड डेमिंग यांनी मिळून तयार केला आहे. गेल्या तीन वर्षांत युझर्स ChatGPT चा वापर कशा प्रकारे करत आहेत, हे समजून घेणे हा या अभ्यासाचा मुख्य उद्देश होता.
- सर्चिंगचा वाढता वापर: 2022 मध्ये लॉन्च झाल्यापासून ChatGPT ने प्रचंड वाढ केली आहे. सध्या दर आठवड्याला 700 दशलक्षहून अधिक लोक त्याचा वापर करत आहेत, म्हणजे जगातील सुमारे 10% लोकसंख्या ChatGPT वापरत आहेत.
- काम आणि इतर वापर: ChatGPT चा फक्त 30% वापर हा कामाशी संबंधित आहे, तर बाकीचा 70% वापर इतर वैयक्तिक कामांसाठी होतो.
- उत्पन्न आणि कामाचा संबंध: ज्या लोकांचे शिक्षण अधिक आहे आणि ज्यांना जास्त पगार मिळतो, अशा लोकांमध्ये कामासाठी ChatGPT चा वापर करण्याचे प्रमाण अधिक आहे.
‘ChatGPT’ चा वापर कशासाठी होतो?
- इमेज निर्मिती: इमेज आणि मल्टीमीडिया तयार करण्यासाठी ChatGPT चा वापर केवळ 5% वाढला, पण सोशल मीडियावर ‘Ghibli-style’ AI इमेजेसचा ट्रेंड आल्यावर या वापरात मोठी वाढ दिसून आली.
- मुख्य वापर: ChatGPT सोबत होणाऱ्या संवादांपैकी सुमारे 77% संवाद व्यावहारिक मार्गदर्शन मिळवण्यासाठी, माहिती शोधण्यासाठी आणि लिखाणाशी संबंधित असतात.
- कामासाठी वापर: ChatGPT चा फक्त 30% वापर हा कामाशी संबंधित असतो, तर बाकीचा 70% वापर इतर वैयक्तिक कामांसाठी होतो.
- सल्लागार: जवळपास 49% युझर्स ChatGPT ला एक सल्लागार मानतात आणि त्याच्याकडून विविध विषयांवर सल्ला घेतात.
- कोडिंगमध्ये घट: कोडिंगसारख्या तांत्रिक कामांसाठी ChatGPT चा वापर जुलै 2024 ते जुलै 2025 दरम्यान 12% वरून 5% पर्यंत कमी झाला आहे.
हे देखील वाचा – मीनाताई ठाकरे पुतळा विटंबना प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले…