Home / देश-विदेश / Abhishek Bachchan & Karan Johar : अभिषेक बच्चन, करण जोहर कोर्टात गेलेत्या व्यक्तिमत्व हक्कांचे महत्व काय?

Abhishek Bachchan & Karan Johar : अभिषेक बच्चन, करण जोहर कोर्टात गेलेत्या व्यक्तिमत्व हक्कांचे महत्व काय?

Gayatri Porje Abhishek Bachchan & Karan Johar Struggle Against Digital Misuse – आजच्या डिजिटल युगात आपण सर्वजण प्रसिद्धीच्या वलयात वावरत...

By: Team Navakal
Abhishek Bachchan & Karan Johar Struggle Against Digital Misuse

Gayatri Porje

Abhishek Bachchan & Karan Johar Struggle Against Digital Misuse आजच्या डिजिटल युगात आपण सर्वजण प्रसिद्धीच्या वलयात वावरत आहे. कोणाचा चेहरा कुठे वापरला जातो, कोणाचे नाव कोणत्या जाहिरातीत झळकते हे अनेकदा संबंधित व्यक्तीलाही माहिती नसते.डिजिटल युगातील (digital era) झपाट्याने बदलत चाललेले तंत्रज्ञान नवीन संधी उपलब्ध करून देत आहे.परंतु याच तंत्रज्ञानामुळे व्यक्तीच्या खासगी आणि सामाजिक जीवनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. चेहरा, आवाज, हावभाव आणि पूर्ण व्यक्तिमत्त्व अगदी काही सेकंदांत कॉपी करता येणे शक्य झाले आहे.

डीपफेक (Deepfake and AI Misuse) तंत्रज्ञान, एआय जनरेटेड क्लिप्स (AI-generated clips)आणि बनावट आवाज देणाऱ्या सॉफ्टवेअरमुळे एखाद्याला न विचारता , त्याची परवानगी न घेता त्याच्या व्यक्तिमत्वाचा परस्पर गैरवापर करणे सहज शक्य झाले आहे. बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, (Aishwarya Rai Bachchan)अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan,) आणि निर्माता करण जोहर (Karan Johar) यांनी अलीकडेच न्यायालयात दाखल केलेली व्यक्तिमत्व हक्कांबाबतची याचिका याच वास्तवाची जाणीव करून देते.

व्यक्तिमत्व हक्क म्हणजे काय ?(Personality Rights-Publicity Rights and Copyright)

प्रत्येक व्यक्तीची स्वतःची एक वेगळे खास ओळख असते. त्या व्यक्तीचे नाव, त्याचा चेहरा , आवाज आणि ओळख यावर त्याचा कायदेशीर अधिकार असतो . हे हक्क कोणाच्याही खासगी आयुष्याचे , सामाजिक आणि व्यावसायिक प्रतिमेचे रक्षण करतात. प्रख्यात व्यक्तिमत्व , कलाकार, खेळाडू, राजकारणी यांच्यासाठी हे हक्क विशेष महत्त्वाचे ठरतात. प्रसिद्ध व्यक्तींचा एक ब्रँड असतो.

त्यांच्या नावाचा किंवा आवाजाचा किंवा चेहर्‍याचा उपयोग अनेकदा जाहिराती, चित्रपट, समाज माध्यम कंटेंट आणि मालमत्तांच्या प्रचारात केला जातो. या गोष्टींचा परवानगीशिवाय वापर केल्यास त्याचा परिणाम त्यांच्या मूल्यावर होते. उदाहरणार्थ, एखाद्या बॉलिवूड अभिनेत्याच्या चेहऱ्याचा वापर करून जर कुणी बेकायदेशीरपणे उत्पादनांची जाहिरात करत असेल तर तो त्या अभिनेत्याच्या व्यक्तिमत्त्व हक्कांचा भंग ठरतो.


व्यक्तिमत्त्व हक्क केवळ सेलिब्रिटींसाठी नसून सामान्य नागरिकासाठीही महत्वाचे आहेत. उदाहरणार्थ, तुमचा फोटो किंवा व्हिडिओ जर तुमच्या संमतीशिवाय इंटरनेटवर अपलोड केला जात असेल किंवा तुमचे नाव वापरून खोटी माहिती पसरवली जात असेल तर तो तुमचा व्यक्तिमत्व हक्कांचा भंग ठरतो.


भारतीय संविधानात यासंदर्भात स्वतंत्र कायदा नाही. मात्र कलम २१ अंतर्गत जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्य या हक्कांमध्ये व्यक्तिमत्व हक्काचा समावेश आहे. यानुसार कॉपीराईट कायदा- १९५७,ट्रेडमार्क कायदा- १९९९ (प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाचे नावे आणि चेहऱ्याच्या वापराबाबत),सायबर कायदा -२०००, तोटा वसुली प्रतिबंध आणि दिवाणी या कायद्यांतर्गत अशा प्रकरणांमध्ये नुकसानभरपाई मिळू शकते संबंधित जाहिरात थांबवता येते,समाज माध्यमावरून किंवा वेबसाईटवरून छायाचित्र , मजकूर हटवण्याचे आदेश न्यायालयाकडून मिळू शकतात. विशिष्ट प्रकरणांमध्ये गुन्हा नोंदवून कारवाई करता येते.

Bollywood Celebrity Rights Cases


आतापर्यंत अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी त्यांच्या व्यक्तिमत्व व प्रसिद्धी हक्कांच्या संरक्षणासाठी दिल्ली न्यायालयात याचिका दाखल केली आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनी नोव्हेंबर २०२२ त्यांचे नाव, चेहरा, आवाज व हावभावांचा अनधिकृत वापर थांबवण्याची मागणी केली होती. ज्येष्ठ अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी जून २०२४ मध्ये याचिका दाखल करत त्यांच्या जॅकी, जग्गू दादा या नावांचा, आवाज, प्रतिमा, हावभाव व संवादांचा अनधिकृत वापर रोखण्याची मागणी केली होती.

अभिनेता अनिल कपूर यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये याचिका दाखल करून त्यांचे नाव, चेहरा, आवाज, संवाद आणि झक्कास सारख्या खास शैलीच्या वापराविरोधात कारवाईची मागणी केली.गायक अरिजीत सिंग यांनी मे २०२४ मध्ये याचिका दाखल करून त्यांच्या आवाजातील गाण्यांचा अनधिकृत वापर थांबवण्याची मागणी केली.दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत यांनी २०१५ मध्ये मद्रास उच्च न्यायालयात मैं हूँ रजनीकांत या चित्रपटाविरुद्ध याचिका दाखल केली होती. त्यांनी नाव, चेहरा, शैली व संवादांचा अनधिकृत वापर रोखण्याची मागणी केली.

न्यायालयाने चित्रपटाचे प्रदर्शन थांबवत, हे प्रकरण व्यक्तिमत्व व प्रसिद्धी हक्कांशी संबंधित असल्याचे मान्य केले होते. तर क्रिकेटपटू युवराज सिंग यांनी त्यांच्या व्यक्तिमत्व व प्रसिद्धी हक्कांच्या भंगाविरोधात ब्रिलीयंट एटोईल या रिअल इस्टेट कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.याप्रकरणात २०२० मध्ये कंपनीसोबत जाहिरात आणि प्रचारासाठी करार केला होता. नोव्हेंबर २०२३ ला तो संपला. परंतु करार संपल्यानंतरही कंपनीने त्यांच्या प्रतिमा, नाव आणि ब्रँड मूल्याचा वापर जाहिरातीत सुरू ठेवला. युवराज यांनी याला अनधिकृत आणि बेकायदेशीर वापर ठरवत नोटीस पाठवली होती.सामान्य लोकांमध्ये व्यक्तिमत्त्व हक्कांबद्दल जागरुकता वाढवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर समाज माध्यमांची जबाबदारी आहे की युजरच्या माहितीचा गैरवापर होऊ नये. त्यासाठी या प्लॅटफॉर्म्सनी अधिक कडक धोरण लागू करणे आवश्यक आहे.


हे देखील वाचा –

‘गो बॅक‌’ची नारेबाजी अदानी अंबुजा सिमेंटला विरोध

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकला सीसीटीव्ही फुटेजच नाही! आरोपी अटक

मीनाताई ठाकरे पुतळा विटंबना प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

Web Title:
संबंधित बातम्या